तुरुंगातील एका जिवंत कैद्याला किडे आणि ढेकणांनी खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील अटलांटा शहरातील एका तुरुंगात ही घटना घडली आहे. कैद्याच्या मृत्यू प्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी आणि वकिलांनी आता तुरुंग प्रशासनाला जबाबदार धरले आहे. मृत कैद्याच्या कुटुंबियांच्या वकिलांनी दावा केला की, तुरुंगाच्या अंधारलेल्या कोठडीत किडे आणि ढेकणांनी जिवंत खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

लाशॉन थॉम्पसन असे या मृत कैद्याचे नाव असून त्याला बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, काही दिवस त्याला सामान्य कारागृहात ठेवण्यात आले होते. परंतु न्यायाधिशांनी दोषी कैद्याला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे घोषित केले. त्यानंतर लाशॉनला फुटलॉन काऊंटी तुरुंगातील मनोरुग्णांसाठीच्या विभागात ठेवण्यात आले.

लाशॉनच्या कुटुंबियांचे वकील मायकेल डी. हार्पर यांनी त्याच्या मृतदेहाचे फोटो जाहीर केले आहेत. ज्यात लाशॉनच्या शरीरावर लाखो किडे आणि ढेकूण असल्याचे दिसून येत आहेत.

सुदानमधील अंतर्गत संघर्षांत भारतीयासह ५६ जणांचा मृत्यू

वकील मायकेल डी. हार्पर यांनी या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. हार्पर यांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले की, थॉम्पसन तुरुंगातील अत्यंत घाणेरड्या कोठडीत मृतावस्थेत आढळून आला होता, ज्या कोठडीत त्याला ठेवण्यात आले होते तिथे मोठ्याप्रमाणात किडे आणि ढेकूण होते. याच किडे आणि ढेकणांनी त्याला जिवंतपणी खाऊन संपवले. थॉम्पसनला ज्या तुरुंगात ठेवण्यात आले ती जागा जनावरांना ठेवण्याच्या लाय देखील नव्हती. अशाप्रकारे मृत्यू होणे योग्य नाही.

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुरुंगाच्या वैद्यकीय अहवालात म्हटले आहे की, ‘थॉम्पसन अटकेच्या ३ महिन्यांनंतर १९ सप्टेंबर रोजी तुरुंगात बेशुद्धावस्थेत सापडला होता. तुरुंग प्रशासनाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. फुल्टन काउंटी तुरुंगातील डॉक्टरांनी एक निवेदन जारी केले असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

तुरुंग प्रशासनाने थॉम्पसनच्या बॅरेकमध्ये किडे आणि किडे असल्याचे मान्य केले आहे. मृताचे वकील हार्पर यांनी आरोप केला की, तुरुंग प्रशासन आणि तेथील डॉक्टरांना थॉम्पसन यांची तब्येत खराब होतेय हे माहित होते पण त्यांनी थॉम्पसन यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.

पण डॉक्टरांच्या अहवालात म्हटले की, थॉम्पसनच्या कोठडीत ढेकणांची समस्या अतिशय गंभीर होती. पण त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमी किंवा खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण काय हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Story img Loader