America Down Another Flying Object : अमेरिकेत पुन्हा एकदा फ्लाईंग ऑब्जेक्ट पाहायला मिळालं आहे. याची माहिती मिळताच अध्यक्ष जो बायडेन यांनी ते पाडण्याचे आदेश दिले. अध्यक्षांच्या आदेशांनंतर अमेरिकन वायू सेनेने उडणाऱ्या वस्तूवर हल्ला करून ती खाली पाडली आहे. ही वस्तू अमेरिका आणि कॅनडा सीमेजवळ फिरत होती. गेल्या एका आठवड्यात अशा चार घटना समोर आल्या आहेत. अमेरिकेविरोधात चीन हेरगिरी करत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सातत्याने अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने आक्रमक झाले आहेत. त्यांनी अशी कोणतीही वस्तू, विमान, बलून दिसल्यास त्यावर हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. अध्यक्षांच्या आदेशांनंतर अमेरिकेच्या वायू सेनेने यूएस-कॅनडा सीमेवर ह्युरोन झीलजवळ त्या वस्तूवर निशाणा साधला. वायू सेनेने एफ-१६ लढाऊ विमानाद्वारे त्या वस्तूवर निशाणा साधला. यापूर्वी अमेरिकेने एका चिनी बलूनवर आणि कॅनेडामध्ये एका कारसदृष्य वस्तूवर असाच हल्ला करून ती वस्तू पाडली होती.
अमेरिकन हवाई दलाचे जनरल ग्लेन वॅनहर्क म्हणाले की, सध्या आम्ही या वस्तूला ऑब्जेक्ट म्हणतोय. याला एअर बलून म्हणता येणार नाही. आमच्या लढाऊ विमानाने हल्ला केल्यानंतर हे ऑब्जेक्ट कॅनडामधील एका तलावात पडलं आहे. सध्या त्याचा तपास सुरू आहे. पेंटागॉन आणि अमेरिकेचे गुप्तचर अधिकारी अलास्का, कॅनडा आणि मिशिगनवरून उड्डाण केलेल्या त्या तीन अज्ञात वस्तू शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्यामध्ये काय होतं, त्याचा वापर कशासाठी केला जात होता याचा तपास सुरू आहे. या तीन वस्तू शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पाडल्या.
हे ही वाचा >> महिलेची विवस्त्र बॉडी डोक्यावर घेऊन गल्लोगल्ली फिरला, पहाटे कॉलनीत.., CCTV फुटेज पाहून पोलीसही अवाक्
जमिनीपासून २०,००० फूट उंचीवरूनर हेरगिरी?
अमेरिकन सैन्यदलाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी २.४२ वाजता राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आदेश देऊन ऑब्जेक्ट पाडलं. अमेरिकेच्या लढाऊ एफ-१६ विमानाने हे काम पूर्ण केलं. ही वस्तू जमिनीपासून २०,००० फूट उंचीवर घिरट्या घालत होती. याचा आकार अष्टकोणी होता. त्याच्या बाजूला काही तारा लोंबकळत होता.