विमान ऑटो पायलट मोडवर टाकून अल्ववयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवल्या प्रकरणी अमेरिकेतील एका कोट्यधीश व्यापाऱ्याला पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. स्टीफन ब्रॅडली मेल (५३) असे आरोपीचे नाव असून तो न्यू जर्सी येथे रहातो. आंतरराज्यीय प्रवासात बेकायद लैंगिक कृत्य करणे तसेत चाइल्ड पॉर्नोग्राफीचे आरोप त्याने मान्य केले आहेत.
स्टीफन मेल तीन मुलांचा पिता असून त्याची ब्रोकरेज कंपनी आहे. अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पीडित मुलीला विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यासाठी तिच्या आईने आरोपीशी संपर्क साधला होता.
शिक्षा सुनावण्याआधी स्टीफनच्या वकिलांनी तो चांगला माणूस असल्याचा युक्तीवाद केला. स्टीफन मेलने एअर लाइफलाइन ही चॅरिटी सुरु केली होती. त्या अंतर्गत वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या लहान मुलांना तो अमेरिकेतील वेगवेगळया भागांमध्ये पोहोचवायचा.