10 Killed In New Orleans Attack : अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्स शहरात भयंकर हल्ला झाला असून, यामध्ये किमान १५ जणांचा मृत्यू आणि ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हल्लेखोराने न्यू ऑर्लिन्समधील बोर्बन स्ट्रीटवर गर्दीत ट्रक घुसवला व नंतर वाहनातून बाहेर पडून गोळीबार करू लागला. याबाबत न्यू ऑर्लियन्स शहर पोलिसांनी माहिती दिली आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अमेरिकेतील न्यू ऑर्लियन्स शहरातील बोर्बन स्ट्रीटवरील गर्दीत हल्लेखोराने ट्रक घुसवला. यामध्ये वाहनाखाली चिरडले गेलेल्या १५ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोराने वाहनातून बाहेर पडत गोळीबार करायला सुरूवात केली. या घटनेमध्ये जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासह या हल्ल्यात दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.

SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Mumbai, Youth murder , Dharavi, murder,
मुंबई : धारावीत तरुणाची हत्या; तिघांना अटक
Nagpur murder, Murder of a youth, revenge ,
उपराजधानीत तीन दिवसांत तिसरे हत्याकांड; मित्राच्या खुनाचा बदला घेत युवकाचा खून
Vishnu Gupta Attack
अजमेर दर्ग्याखाली शिव मंदिर असल्याचा दावा करणाऱ्या विष्णू गुप्तांच्या कारवर गोळीबार, थोडक्यात बचावले
bhandara blast 8 died
भंडारा आयुध निर्माणीत स्फोट; आठ ठार
municipal corporation has drawn up rules for developers to prevent air pollution during construction in city
ठाण्यातील विकासकांना काम थांबविण्याचे आदेश, हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई

हा दहशतवादी हल्ला, महापौरांची प्रतिक्रिया

या घटनेवर प्रतिक्रिया देताना न्यू ऑर्लीन्सचे महापौर लाटोया कँट्रेल यांनी हा “दहशतवादी हल्ला” असल्याचे म्हटले आहे. पण, बुधवारी पहाटे ट्रक गर्दीत घुसला तेव्हा नेमकं काय घडले याचा तपास एफबीआयने सुरू केला आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओमध्ये जमिनीवर अनेक लोक गंभीर जखमी झाल्याचे दिसत आहे.

ही घटना घडल्यानंतर न्यू ऑर्लीन्स शहर आपत्कालीन विभागाने एक्सवर पोस्ट करत, “कॅनल आणि बोर्बन स्ट्रीटवर मोठा अपघात घडला आहे. या परिसरापासून दूर राहा”, असे म्हटले आहे.

हे ही वाचा : Video: महिला अधिकाऱ्याची पहिल्याच पोस्टिंगमध्ये लाचखोरी; कॅमेऱ्यात सगळा प्रकार कैद; पदावरून गच्छंती!

दरम्यान न्यू ऑर्लीन्स हल्ल्यातील हल्लेखोराचा मृत्यू झाल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले. जाणूनबुजून हे कृत्य केल्याचे काही पुरवे सापडल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एफबीआय आणि पोलीस संयुक्तपणे या हल्लामागे काय हेतू आहे याचा शोध घेण्यासाठी वाहनाची तपासणी करत आहेत.

हे ही वाचा : ३५ हजार फुटांवरही वापरता येणार सोशल मीडियापासून ई-मेलपर्यंतच्या सुविधा, Air India पुरवणार मोफत इंटरनेट

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पांढऱ्या रंगाचा ट्रकने बॅरिकेड्स तोडून फुटपाथवरील लोकांना चिरडले. या घटनेवेळी तिथे उपस्थित असलेला २२ वर्षांचा केविन गार्सिया म्हणाला की, “बोर्बन फुटपाथच्या डाव्या बाजूला एक ट्रक प्रत्येकाला चिरडत असल्याचे मी पाहिले. यावेळी एक मृतदेह माझ्याकडे दिशेने उडल्याचेही मी पाहिले. यानंतर लगेचच मला आला गोळाबाराचाही आवज ऐकू आला.” याबाबत सीएनएनने वृत्त दिले आहे.

Story img Loader