मुंबई : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी चालवलेल्या धोरणबदलाच्या धडाक्यामुळे मंगळवारी जागतिक राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना, पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आरोग्य आणि हवामान बदल या दोन कळीच्या मुद्द्यांवरील चर्चेला मोठा धक्का बसला आहे. त्याच वेळी कॅनडा, मेक्सिको या शेजारी राष्ट्रांपाठोपाठ आता भारताचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ देशांवरही व्यापार कर लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली. त्यांच्या धोरणदिशेबद्दलची भीती मंगळवारी भारतीय भांडवली बाजारातही दिसून आली आणि सेन्सेक्स-निफ्टी दीड टक्क्याहून मोठ्या आपटीसह, सात महिन्यांपूर्वीच्या नीचांकावर घसरले.

अमेरिकेचे ४७वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी शपथ ग्रहण केली. त्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी अमेरिकी प्रशासनाशी संबंधित अनेक आदेश जारी केले. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळातील डझनभर निर्णय रद्द करतानाच ट्रम्प यांनी अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरितांविरोधात कठोर कारवाईसही मंजुरी दिली. ‘अमेरिका फर्स्ट’ या प्रखर राष्ट्रवादी धोरणांचा भाग म्हणून मेक्सिको, कॅनडा या शेजारी राष्ट्रांवर १ फेब्रुवारीपासून २५ टक्के व्यापार कर लागू करण्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच भारत, चीन यांचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ राष्ट्रांनी डॉलरऐवजी स्वतंत्र चलन सुरू केल्यास त्यांच्यावर १०० टक्के व्यापार कर लावण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रचारमोहिमेदरम्यान जाहीर केल्यानुसार जागतिक आरोग्य संघटना आणि पॅरिस हवामान करारातूनही बाहेर पडण्याच्या आदेशावर त्यांनी स्वाक्षरी केली. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री उशिरा ते आणखी काही महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

security forces killed 14 naxalites
छत्तीसगड-ओडिशा सीमेवर चकमकीत १४ नक्षलवादी ठार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
World Economic Forum Davos Investment for Maharashtra
Davos Investment : दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींचे करार; महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार मोठा बूस्ट
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
loksatta editorial on devendra fadnavis
अग्रलेख : आजचे बालक; उद्याचे पालक!
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

हेही वाचा :छत्तीसगड-ओडिशा सीमेवर चकमकीत १४ नक्षलवादी ठार

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेच्या व्यापार धोरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. जगातील या सर्वात मोठ्याअर्थव्यवस्थेचे, चीन आणि भारतासारख्या देशांना लक्ष्य करणारी व्यापार धोरणे ते आणू शकतील, अशी शक्यता आहे. त्याचा परिणाम मंगळवारी भारतीय भांडवली बाजारांवर झाला. सेन्सेक्स १२३५.०८ अंशांनी घसरून ७५८३३.३६ वर बंद झाला तर, निफ्टीमध्ये ३२०.१० अंशांची घसरण झाली. ही घसरण बाजाराला सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घेऊन गेली. लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणी कल पाहून ६ जून २०२४ ला बाजाराने गाठलेल्या नीचांक पातळीवर निर्देशांकांनी आता पुन्हा फेर धरला आहे.

अर्थसंकल्पपूर्व साशंकतेचीही भर

ट्रम्प यांच्या संभाव्य धोरणांबद्दल बाजारातील भावना साशंक आहेत आणि पर्यायाने बाजारावर अस्थिरतेचे सावटही मोठे असल्याचे, मंगळवारच्या मोठ्या चढ-उतारांनी दाखवून दिले. यातून जानेवारीमध्ये आतापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी जवळपास ५८ हजार कोटी रुपये मूल्यांच्या रोख्यांची विक्री केली आहे. कंपन्यांच्या तिमाही निकालांतील निराशेमुळे विक्रीला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, आठवड्यावर आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीबाबत साशंकतेतून, देशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांचा सध्या कुंपणावर बसून प्रतीक्षा करण्याचा पवित्रा अस्थिरतेत भर घालणारा ठरत आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले.

हेही वाचा :Turkey Fire Accident : तुर्कीतील स्की रिसॉर्ट हॉटेलला भीषण आग! किमान ६६ जणांचा मृत्यू, ५१ जण जखमी

ट्रम्प यांचे अन्य निर्णय

● हवामान करार, जागतिक आरोग्य संघटनेला सोडचिठ्ठी

● ६ जानेवारी २०२४ रोजी कॅपिटॉल इमारतीवर केलेल्या हल्ल्यातील १५०० आरोपींना माफी.

● सर्व प्रकारच्या परराष्ट्र मदतीला ९० दिवसांसाठी स्थगिती

● ‘मेक्सिकोचे आखात’ऐवजी ‘अमेरिकेचे आखात’ असे नामांतर

● स्थलांतर रोखण्यासाठी अमेरिकेच्या दक्षिण सीमा बंद

● पारलिंगी (ट्रान्सजेन्डर) समुदायाचे संरक्षण मागे.

Story img Loader