तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धसमाप्तीसाठी उभय देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र त्याचवेळी रशिया-युक्रेन यांच्यात शांतता चर्चा सुरू असताना हल्ले मात्र सुरूच आहेत़  युक्रेनच्या चेर्नीहीव्ह शहरात बुधवारी रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात दहा नागरिक ठार झाले.  आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील ६९१ नागरिकांचा मृत्यू झाला असून, १,१४३ जण जखमी झाले, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. तसेच युक्रेनमधून सुमारे ३० लाख नागरिकांनी स्थलांतर केले आह़े. एकीकडे हा संघर्ष सुरु असतानाच आता तीन आठवड्यानंतर अमेरिकेने थेट युक्रेनसाठी मदतीचा हात पुढे केलाय. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वीच युक्रेनला हवी ती मदत करण्याचा शब्द दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मोठ्या मदतीची घोषणा केलीय.

नक्की पाहा >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

किती आर्थिक मदत?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी अमेरिकन संसदेमध्ये युक्रेनमध्ये कोणती मदत पाठवली जाणार आहे याची सविस्तर माहिती दिली. यामध्ये त्यांनी आर्थिक मदतीबरोबरच लष्करी म्हणजेच शस्त्रास्त्रही युक्रेनला दिली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.युक्रेनसाठी आम्ही ८०० मिलियन अमेरिकन डॉलर्सची संरक्षण विषयक आर्थिक मदत युक्रेनला देणार आहोत, असं बायडेन म्हणालेत.

Will Trump start a war over the Panama Canal Why is this issue so important to America
पनामा कालव्यासाठी ट्रम्प युद्ध छेडणार? अमेरिकेसाठी हा मुद्दा इतका महत्त्वाचा का?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
review of impact on india stock market and economy after donald trump comes to power
Money Mantra : ट्रंप यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे आपलं आयुष्य का बदलणार?
Russia-Ukraine war Putin Trump
Vladimir Putin: ‘ट्रम्प २०२० साली हरले नसते तर रशिया-युक्रेन युद्ध झालंच नसतं’, पुतिन यांचं मोठं विधान
russia ukraine war
Russia Ukraine War : युद्ध थांबविण्यासाठी झेलेन्स्की तयार
DRDO scramjet test loksatta
डीआरडीओची स्क्रॅमजेट चाचणी काय होती? भारताची हायपरसॉनिक क्षेपणास्त्र क्षमता लवकरच अमेरिका, रशिया, चीनच्या तोडीची?
trump warns Russia marathi news
Donald Trump : रशियावर निर्बंध लादण्याचा ट्रम्प यांचा इशारा
Donald Trump
Donald Trump : ट्रम्प यांची रशियाला धमकी! म्हणाले, “जर युक्रेनविरोधातील युद्ध थांबले नाही तर…”

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

कोणत्या लष्करी मदतीची घोषणा?
याशिवाय सातत्याने शस्त्रांच्या स्वरुपात मदतीची मागणी करणाऱ्या युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना म्हणजेच वोलोडिमिर झेलेन्स्कींना दिलासा देणारी शस्त्रांच्या स्वरुपातील मदतही अमेरिकेने जारी केलीय. अमेरिकेकडून युक्रेन देण्यात येणाऱ्या मदतीच्या पॅकेजमध्ये काय काय असणार आहे याबद्दल खुलासा करताना बायडेन यांनी, अमेरिकेकडून ८०० अ‍ॅण्टी-एअरक्राफ्ट सिस्टीम्स, नऊ हजार अ‍ॅण्टी-आर्मोर (मिसाइल) सिस्टीम्स, सात हजार छोट्या आकाराची शस्त्र ज्यामध्ये लहान बंदुकी आणि ग्रेनेड लॉन्चर्स या गोष्टी युक्रेनला पुरवल्या जाणार आहे. तसेच युक्रेनला लष्करी ड्रोन्सचीही मदत अमेरिकेकडून केली जाणार असल्याचं बायडेन म्हणालेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी काही आठवड्यांपूर्वीच बायडेन यांच्याशी चर्चा झाली तेव्हाच शस्त्र पुरवण्याची मागणी अमेरिकेकडे केली होती. 

नक्की वाचा >> Ukraine War: “या गुलाबाच्या फुलाचं काय करु? त्यापेक्षा…”; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्याची केंद्र सरकारवर टीका

युक्रेनला थेट पाठिंबा…
युक्रेनवरील आक्रमणात वापरण्यासाठी रशियाने चीनकडे लष्करी सामग्रीची मागणी केली असल्याचे अमेरिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने म्हटल्यानंतर काही तासांमध्ये अमेरिकेने १४ मार्च रोजी एक फार मोठा निर्णय घेतला होता. युद्धाबाबतचा तणाव वाढत असतानाच आता अमेरिकेने युक्रेनच्या बाजूने युद्धात उतरण्याचा निर्णय घेतलाय.

नक्की वाचा >> Ukraine War: दोघांचं भांडण चीनचा लाभ! निर्यात भरमसाठ वाढली, आकडेवारी पाहून थक्क व्हाल

युक्रेनला शस्त्र पुरवली जाणार…
रशियाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिका आता युक्रेनला शस्त्रसाठा पुरवणार आहे असं बायडेन यांनी १४ तारखेलाच सांगितलं होतं. त्याचप्रमाणे अमेरिका आता युक्रेनमधून अमेरिकेत येणाऱ्या विस्थापितांनाही मदत करणार असून त्यांना देशात प्रवेश दिला जाईल असं अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलेलं. “रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये संरक्षणासाठी युक्रेनकडे शस्त्र असतील याची आम्ही काळजी घेऊ. युक्रेनमधील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आम्ही शस्त्र, पैसे आणि इतर मदत करणार आहोत. आम्ही युक्रेनमधील विस्थापितांनाही समावून घेणार आहोत,” असं बायडेन यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

नक्की वाचा >> Ukraine War: २१ वर्षीय भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या लष्करात झाला भरती; आई म्हणते, “पाच दिवसांपासून…”

लष्करी मदतीसोबतच ही मदतही करणार…
अमेरिकेने संपूर्ण ताकदीनिशी आता युक्रेनच्या मागे उभं राहण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र सध्या दिसत आहे. लष्करी मदत म्हणजेच शस्त्र पुरवण्याबरोबरच अमेरिका युक्रेनला आर्थिक मदतही करणार आहे. आम्ही युक्रेनसाठी आर्थिक मदत तसेच अन्नधान्य, औषधं, पाणी आणि इतर माध्यमातून युद्धग्रस्त देशाला मदत करणार आहोत असं बायडेन म्हणालेत.

नक्की वाचा >> Ukraine War: रशियन उद्योजकाने दिली पुतिन यांची साडेसात कोटींची सुपारी; म्हणाला, “जिवंत किंवा मृत पकडून…”

रशियाचा तटस्थतेचा प्रस्ताव युक्रेनला अमान्य
दुसरीकडे, ऑस्ट्रीया, स्वीडनप्रमाणे तटस्थतेचे धोरण अंगिकारण्याचा रशियाचा प्रस्ताव युक्रेनने बुधवारी फेटाळला. मात्र, शांतता चर्चेतून तोडगा काढण्याचा रशिया-युक्रेन यांचा आशावाद कायम आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव्ह यांनी युक्रेनने तटस्थतेचे धोरण स्वीकारावे, ही आग्रही मागणी केली,  हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याने उभय देशांदरम्यान तोडगा निघण्याची आशा असल्याचे लावरोव्ह यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, ऑस्ट्रीया, स्वीडनप्रमाणे तटस्थतेचा प्रस्ताव अमान्य असल्याचे युक्रेनने स्पष्ट केले. ‘‘सध्या रशिया-युक्रेन यांच्यात थेट युद्ध सुरू आहे. त्यामुळे कायदेशीर सुरक्षेची हमी असलेले युक्रेनियन प्रारुपच हवे. अन्य कोणत्याही देशाचे प्रारूप नको’’, अशी भूमिका युक्रेनचे संवादक मिखाईलो पोडोयाक यांनी मांडली. आंतरराष्ट्रीय सुरक्षा हमी कराराचा आग्रह त्यांनी कायम ठेवला.

नक्की वाचा >> Ukraine War: “मी मेलो तरी…”; पाळीव बिबट्या, ब्लॅक पँथरला युक्रेनमध्ये सोडून येण्यास भारतीयाचा नकार

चर्चा निर्णायक टप्प्यावर…
युक्रेनला ‘नाटो’मध्ये सहभागी करून घेण्याचे आश्वासन या संघटनेने २००८ मध्ये दिले होते. रशियाने त्यास सुरूवातीपासूनच विरोध केला. आता ‘नाटो’मध्ये सहभागी न होण्यासह युक्रेनच्या निर्लष्करीकणाचा रशियाचा आग्रह आहे. त्यामुळेच शांतता चर्चा निर्णयक टप्प्यावर असल्याचे रशियाचे म्हणणे आहे.

युक्रेनचा ताबा घेण्याचा विचार नाही : पुतिन
स्वसंरक्षणासाठी युक्रेनमध्ये ‘लष्करी मोहीम’ राबविण्याशिवाय पर्याय नव्हता, असा दावा करत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनचा ताबा घेण्याचा विचार नाही, असे बुधवारी स्पष्ट केले.  क्रिमियासह अन्य भागांत हल्ल्याचा युक्रेनचा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावाही पुतिन यांनी केला.

Story img Loader