तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धसमाप्तीसाठी उभय देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र त्याचवेळी रशिया-युक्रेन यांच्यात शांतता चर्चा सुरू असताना हल्ले मात्र सुरूच आहेत़ युक्रेनच्या चेर्नीहीव्ह शहरात बुधवारी रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात दहा नागरिक ठार झाले. आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील ६९१ नागरिकांचा मृत्यू झाला असून, १,१४३ जण जखमी झाले, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. तसेच युक्रेनमधून सुमारे ३० लाख नागरिकांनी स्थलांतर केले आह़े. एकीकडे हा संघर्ष सुरु असतानाच आता तीन आठवड्यानंतर अमेरिकेने थेट युक्रेनसाठी मदतीचा हात पुढे केलाय. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काही दिवसांपूर्वीच युक्रेनला हवी ती मदत करण्याचा शब्द दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मोठ्या मदतीची घोषणा केलीय.
नक्की पाहा >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा