अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारमध्ये आणखी एका भारतीय वंशाच्या महिलेला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. जो बायडेन यांनी भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची देशांतर्गत धोरणविषयक सल्लागार पदी नियुक्ती केली आहे. त्या विद्यमान सल्लागार सुसान राइस यांची जागा घेतील. या निर्णयानंतर नीरा टंडन या व्हाईट हाऊसच्या सल्लागार समितीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला अधिकारी असतील.

हेही वाचा – जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले; ‘बिलावल हे दहशतवाद उद्योगाचे प्रवर्तक’

Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
ex cm prithviraj chavan refuse to accept congress state president post
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच कायम;पृथ्वीराज चव्हाणांचा नकार
mohan bhagwat
Mohan Bhagwat : “घरवापसीमुळे आदिवासी देशद्रोही झाले नाहीत!” प्रणब मुखर्जींच्या विधानाचा मोहन भागवतांनी दिला दाखला
India Women Register 435 Highest ODI Total
India Women Highest ODI Total: भारतीय महिला संघाची वनडेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या, पुरूष संघालाही टाकलं मागे

यासंदर्भात बोलताना जो बायडेन म्हणाले, मला हे जाहीर करताना आनंद होतो आहे की यापुढे नीरा टंडन या अमेरिकेच्या देशांतर्गत धोरणविषयक समिमीच्या सल्लागार असतील. नीरा टंडन यांचं ज्ञान, चिकाटी आणि राजकीय बाबींवर असलेल्या अभ्यासाचा देशाला फायदा होईल.

हेही वाचा – विश्लेषण: कसा होणार राजे चार्ल्स (तृतीय) यांचा राज्याभिषेक?

पुढे बोलताना त्यांनी विद्यमान सल्लागार सुसान राइस यांचे आभारही मानले. गेल्या दोन वर्षांत सुसान राइसने देशांतर्गत धोरणाचा अजेंडा तयार करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या सेवेबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.

हेही वाचा – WHO On Corona: आनंदाची बातमी! करोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेची मोठी घोषणा

नीरा टंडन नेमक्या आहेत कोण?

नीरा टंडन यांचा जन्म मॅसाच्युसेट्समध्ये झाला होता. त्यांनी कॅलिफोर्निया आणि येल विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांना सार्वजनिक धोरण क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत अमेरिकेतील तीन राष्ट्रपतीबरोबर काम केलं आहे. तसेच डाव्या विचारसरणीची थिंकटँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंटर फऑर अमेरिकन प्रोग्रेसच्या (सीएपी) अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारीदेखील त्यांनी सांभाळली आहे. त्यांना हिलेरी क्लिंटन यांची विश्वासू सहकाही म्हणून ओळखलं जातं.

Story img Loader