Israel Palestine War : इस्रायल आणि पॅलेस्टईनमध्ये सुरू असलेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. पॅलेस्टाईनमधली दहशतवादी संघटना हमासने शनिवारी (७ ऑक्टोबर) इस्रायलवर हजारो क्षेपणास्रं डागून युद्धाला सुरवात केली. बेसावध असलेल्या इस्रायलसाठी हा मोठा धक्का होता. या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो इस्रायली नागरिक ठार झाले आहेत. तसेच हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करून १५० हून अधिक इस्रायली महिलांचं अपहरण केलं आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याने गाझा पट्टीवर हल्ला चढवला, तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत २,००० हून अधिक लोक मारले गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, जगभरातल्या अनेक देशांनी इस्रायल किंवा पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे. यापैकी अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभी आहे. तर लेबनान आणि इराणमधून पॅलेस्टाईनला, हमासला मदत मिळत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अमेरिकेचे अधक्ष जो बायडेन यांनी इराणच्या भूमिकेवरून संताप व्यक्त केला. तसेच बायडेन यांनी इराणला हमास-इस्रायल वादात पडू नका असा इशारा दिला आहे. दुसऱ्या बाजूला ही युद्ध परिस्थिती हाताळण्यासाठी इस्रायलने मोठा निर्णय घेतला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि विरोधी पक्षनेते बेनी गॅंट्झ यांनी हमासच्या दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी आपत्कालीन युद्ध सरकार स्थापन केलं आहे

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन इस्रायलला जाणार आहेत. तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी ज्यू नेत्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत बायडेन म्हणाले, आम्ही इस्रायलच्या दिशेने पाठवलेली आमची विमानं आणि युद्धनौका हा इराणसाठी संदेश आहे. कारण ते हमास आणि हिजबुल्लाहचं (लेबनानमधील दहशतवादी संघटना) समर्थन करतात.

हे ही वाचा >> विश्लेषण : हमासची युद्धशैली बदलत आहे का ?

बायडेन म्हणाले, हमासचा हा एक क्रूर हल्ला होता. तो दिवस (हल्ला झाला तो दिवस – ७ ऑक्टोबर) ज्यू समुदायासाठी काळा दिवस होता. आम्ही इस्रायली संरक्षण दलांना अतिरिक्त लष्करी सहाय्य पुरवत आहोत. तसेच या सैन्य तुकड्यांमध्ये वाढ केली जाईल. अमेरिका इस्रायलला दारू-गोळा पुरवत आहे. आम्ही पूर्व भूमध्य समुद्रात सैन्य आणि शस्त्रास्र वाहून नेणारी जहाजं तैनात करत आहोत. तसेच तिथे लढाऊ विमानं पाठवत आहोत. हा इराणसाठी सावधानतेचा इशारा आहे.