पीटीआय, वॉशिंग्टन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार तसेच विद्यामान उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील ही लढत अत्यंत अटीतटीची झाली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचे भाकीत राजकीय पंडितांना करता आलेले नाही.

अत्यंत विखारी प्रचारानंतर होत असलेल्या या निवडणुकीत अमेरिकेचा ४७ वा अध्यक्ष कोण होणार, हे निश्चित होणार आहे. मतदानाची उलटगणती सुरू असताना ट्रम्प यांनी ‘२०२०मध्ये मी व्हाइट हाऊस सोडायलाच नको होते. आम्ही खूप चांगले प्रयत्न केले होते’, असे विधान केले आहे. २०२०मधील निवडणुकीनंतर जो बायडेन अध्यक्ष झाले. ट्रम्प यांनी मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित केली आणि न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच ‘कॅपिटॉल हिल’ इमारतीबाहेर ट्रम्प समर्थकांनी दंगल घडविली होती. हॅरिस यांनी ट्रम्प यांच्याविरोधात टीकेची राळ उडवली आहे. मिशिगन येथे प्रचाराचा शेवट करताना त्यांनी ‘सर्व अमेरिकी नागरिकांची मी अध्यक्ष असेन’, असे विधान केले. ‘द्वेष आणि विभाजन’ यावर अमेरिकींनी आता व्यक्त होण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा >>>जम्मू-काश्मीर विधानसभेत गोंधळ; सहा वर्षांनंतर भरलेल्या अधिवेशनाचा पहिलाच दिवस गाजला

डेमोक्रेटिक प्रचाराचे मुद्दे

●समानता, बंधुता

●मूलभूत स्वातंत्र्य

●घटनात्मक मूल्ये, महिलांचे हक्क

●गाझा पट्टीतील संघर्षविराम

रिपब्लिकन प्रचाराचे मुद्देे

●अमेरिकेची अर्थव्यवस्था

●बेकायदा स्थलांतरित

●बायडेन प्रशासनाची धोरणे

●जगभरातील हिंदूंचे रक्षण

निर्णायक राज्ये : अॅरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्वेनिया, विस्कॉन्सिन

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us presidential election kamala harris donald trump amy