रियाध : रियाधच्या ‘दिरिया पॅलेस’ येथे अमेरिका आणि रशियाच्या शिष्टमंडळाने सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैज बिन फरहान अल सौद, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद अल ऐबन भेट घेतली. अमेरिकेच्या शिष्टमंडळात परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ, मध्यपूर्वेतील दूत स्टीव्ह विटकॉफ यांचा तर रशियाच्या शिष्टमंडळात परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह, व्लादिमिर यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी युशाकोव्ह यांचा समावेश होता.

यानंतर झालेल्या बैठकीत युक्रेन युद्ध थांबवण्यावर आणि द्विपक्षीय संबंध पुन्हा सुधारण्यावर चर्चा करण्यात आली. मात्र, आपला समावेश नसलेल्या चर्चेचे फलित आपल्याला मान्य नसल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट कधी होईल हे मात्र निश्चित झाले नाही.

Story img Loader