इस्रायलच्या सीमेवर हमास ही दहशतवादी संघटना आणि इस्रायली लष्करात धुमश्चक्री सुरू आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी (७ ऑक्टोबर) पहाटे इस्रायलवर अचानकपणे हल्ला केला. हमासने इस्रायलवर ५ हजार रॉकेट्स डागले. या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. दरम्यान, इस्रायलनेही गाझा पट्टीत (हा भाग हमास आणि पॅलेस्टाईनच्या ताब्यात आहे) रॉकेट हल्ले केले. या युद्धात आतापर्यंत १,००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धाने जगातला बलाढ्य देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्याही चिंता वाढवल्या आहेत.

हमासचे इस्रायलवरील हल्ले थांबावेत यासाठी अमेरिकेने यूएई, सौदी अरब आणि तुर्कीयेसारख्या राष्ट्रांशी बातचीत सुरू केली आहे. याचदरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी या युद्धामागची कारणं स्पष्ट केली आहेत. हल्ल्यामागे हमासचा नेमका काय हेतू होता? यावर ब्लिंकन यांनी भाष्य केलं आहे.

Hamas-Israel armistice in Gaza after 15 months of intense war
हमास-इस्रायल दरम्यान गाझात युद्धविराम… पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदेल?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
donald trump s desire to acquire greenland
अन्वयार्थ : ट्रम्प यांचा ग्रीनलँडहट्ट
Israel Hamas War reuters
इस्रायल-हमासमधील युद्ध आज थांबणार? कतारचे मध्यस्थीचे प्रयत्न; युद्धबंदीसाठी प्रस्ताव
Amit Shah Slams Uddhav Thackeray
Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
बोलघेवडेपणा करू नका!अमित शहा यांच्या नेत्यांना कानपिचक्या
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अँटनी ब्लिंकन म्हणाले, इस्रायल आणि सौदी अरबमधील सुधारू पाहत असलेले संबंध बिघडवणं हे इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यामागचं प्रमुख कारण असू शकतं. अलिकडच्या काळात अनेक देशांशी इस्रायलचे संबंध सुधारले आहेत. परंतु, ही गोष्ट हमासला सहन होणारी नाही. तर दुसऱ्या बाजूला इराणचं समर्थन मिळू लागल्यापासून हमास मजबूत झाली आहे. पॅलेस्टाईन आणि इराणमधील सबंध आजघडीला खूप मजबूत झाले आहेत. या हल्ल्यामागे इराण आहे का याबाबत अद्याप आमच्याकडे ठोस पुरावे नाहीत. परंतु, उभय देशांमधील दृढ झालेले संबंध नक्कीच यामागे आहेत. या दृढ संबंधांनंतर हमास मजबूत होऊ लागली आहे.

हे ही वाचा >> सिक्कीममध्ये ९ लष्करी जवानांसह ३२ जणांचे मृतदेह सापडले; अद्याप बेपत्ता असलेल्या शंभर लोकांचा शोध सुरू

दरम्यान, हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यात ६०० हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, हमासला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने ‘ऑपरेशन आयर्न स्वोर्ड्स’ ही मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत केलेल्या हवाई आणि लष्करी हल्ल्यात ३७० हमास नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीत बॉम्ब हल्ले सुरूच आहेत. हमासने १०० नागरिक आणि सैनिकांचं अपहरण केल्याचं इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी म्हटलं आहे की “गाझामधील ४२६ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे. यात हमासकडून रॉकेट हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या १० टॉवर्सचाही समावेश आहे. यातले बहुतांश टॉवर्स जमीनदोस्त करण्यात इस्रायली हवाईदलाला यश मिळालं आहे.

Story img Loader