Alanis Pinion : अमेरिकेतील डेलावेर शहरात असलेल्या कॅथोलिक शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकविणाऱ्या एका महिला शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्याला स्वतःचे नको त्या अवस्थेतले फोटो पाठविल्यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. न्यूयॉर्क पोस्टने सदर बातमी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी सांगितले की, ॲलानिस पिनियन नावाच्या २४ वर्षीय शिक्षिकेने तिच्या माजी विद्यार्थ्याला नको ते फोटो पाठवले. सेंट मेरी मॅग्डालेन शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याला सदर फोटो पाठविल्यानंतर विद्यार्थ्याने याची माहिती पालकांना दिली. पालकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर न्यू कॅसल काऊंटी पोलिसांनी सदर शिक्षिकेला १८ जुलै रोजी अटक केली आणि याची माहिती तिच्या विद्यमान शाळेला दिली.

१८ वर्षांखालील अल्पवयीन मुलाला लैंगिक फोटो पाठवणे आणि बालकल्याण धोरणाला धोका पोहोचवण्याबद्दल ॲलानिसवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर शिक्षिका ॲलानिसला जामीन देण्यात आला. मात्र जामिनासाठी ४६ हजार डॉलर्सचा बाँड भरण्यात असमर्थ ठरल्यानंतर आरोपी शिक्षिकेची रवानगी महिला सुधार संस्थेत करण्यात आली.

पोलिसांना संशय आहे की, सदर शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांनाही असेच फोटो पाठवले असावेत. मात्र इतर पीडित विद्यार्थी समोर आलेले नाहीत. सेंट मेरी मॅग्डालेन शाळेतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, आरोपी शिक्षिका ॲलानिस ही शाळेची पूर्णवेळ कर्मचारी नव्हती. ती कंत्राटी शिक्षिका म्हणून काम करत होती. तसेच तिची पार्श्वभूमी तपासूनच तिला शाळेत रुजू केले होते. नुकतेच ३० जून रोजी तिचे एक वर्षांचे कंत्राट संपले होते.

हे वाचा >> महिला शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यासह मैदानातच केला सेक्स, पोलिसांनी केली अटक

अमेरिकेत असे प्रकार नवे नाहीत. याआधीही अनेकदा महिला शिक्षिकांकडून विद्यार्थ्यांबाबत असे प्रकार घडले आहेत. मे महिन्यात लुईझियानामध्ये एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना न्यूड फोटो पाठवून त्यांच्यासाठी मद्य विकत घेतले होते. तसेच काही विद्यार्थ्यांशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले होते, अशी बातमी न्यूयॉर्क पोस्टने दिली होती. त्याच महिन्यात आर्कान्सामध्ये एका २६ वर्षीय शिक्षिकेला चर्चमध्ये १५ वर्षांच्या मुलाशी लैंगिक गैरवर्तन केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us school teacher accused of sending sexually explicit photos to teen student get arrested kvg