अमेरिकेत भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीला टोळक्याने अमानूष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कॅलिफोर्नियात आयटी तज्ज्ञ म्हणून काम करणा-या मानसिंह खालसा यांना मारहाण करण्यात आली असून या मारहाणीत खालसा यांना गंभीर दुखापत झाली आहे.  या घटनेची चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी अमेरिकेतील सामाजिक संस्थांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅलिफोर्नियातील आयटी तज्ज्ञ मानसिंह खालसा हे २५ सप्टेंबररोजी स्वतःच्या गाडीने घरी परतत होते. त्याच वेळी एका टोळक्याने त्यांच्या वाहनावर दारुची बॉटल फेकली. मात्र तरीदेखील खालसा तिथून निघून गेले. यानंतर त्या टोळक्याने खालसा यांचा पाठलाग केला. त्यांनी गाडी चालवणा-या खालसा यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले आणि धक्का देऊन त्यांची पगडी पाडली.  खालसा यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर हे २० ते ३० वर्ष वयोगटातील होते. यातील तिघांनी खालसा यांना मारहाण केली. हल्लेखोरांनी धावत्या गाडीतच खालसा यांचे डोक बाहेर खेचले आणि हातात आलेले केस चाकूने कापून टाकले. अमेरिकेतील वंशभेदाच्या या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. या हल्ल्यात खालसा यांच्या हाताला आणि चेह-याला गंभीर दुखापत झाली आहे.

अमेरिकेतील  शीख समाजाची सर्वात मोठी संघटना असलेल्या द शीख कोएलिशनच्या पदाधिका-यांनी रिचमंड पोलिसांना पत्र दिले आहे. यात त्यांनी खालसा यांच्यावर हल्ला करणा-या तरुणांना अटक करुन त्यांच्यावर तात्काळ खटला दाखल करावा अशी मागणी केली आहे. अमेरिकेत शीख नागरिकांवर हल्ला होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. द शीख कोएलिशनच्या माहितीनुसार गेल्या पंधरा वर्षात १०० हून अधिक शीख नागरिकांवर वंशभेदातून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us sikh man brutally assaulted hair cut by knife in alleged hate crime
Show comments