उत्तर कोरियाने गेल्या १२ फेब्रुवारी रोजी केलेल्या तिसऱ्या अणुचाचणीमु़ळे संयुक्त राष्ट्रांनी लागू केलेल्या नव्या र्निबधांविरोधात उत्तर कोरियाने थयथयाट सुरू केला आहे. या र्निबधांना प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियन राज्यकर्त्यांनी दक्षिण कोरियाशी केलेला शांतता करार रद्द केला आहे.
उत्तर कोरियाच्या या निर्णयामुळे कोरियन द्वीपकल्पातील तणाव आणखी वाढला आहे. गुरुवारीच या देशाने अमेरिका आणि द. कोरियावर अणुहल्ला करण्याची धमकी दिली होती. द. कोरियन राज्यकर्ते आक्रस्ताळी आणि आक्रमक म्हणून ओळखले जातात, पण त्यांच्या या आक्रमकतेने आता टोक गाठले आहे. तशातच दक्षिण आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांनी पुढच्या आठवडय़ात लष्करी सराव आयोजित केला आहे. त्यातून या दोन्ही देशांदरम्यान युद्धप्रसंग उद्भवण्याची भिती आहे.  दरम्यान, या र्निबधांचा त्या देशावर तीव्र परिणाम होईल, अशी आशा अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूत सुसान राईस यांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader