भारत पर्यटकांसाठी नंदनवन आहे मात्र महिलांसाठी नरक असल्याची भावना भारतात अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या मायकेला क्रॉस या विद्यार्थीनीने शब्दबद्ध केली आहे.
‘इंडिया द स्टोरी यू नेव्हर वॉन्टेड टू हिअर’ या निबंधात भारतात फिरताना आलेल्या अनुभवांचे कथन करण्यात आले आहे. चांगल्या अनुभवांबरोबच काही भयानक अनुभवातून जावे लागले. यातलोचट स्पर्श, छेडछाड अशा घटनांना तोंड द्यावे लागल्याचे मायकेलाने सांगितले.  सीएनएन वाहिनीवर तीचे अनुभव आल्यानंतर खळबळ माजली. तीला आठ लाखांपेक्षा अधिक ‘पेज व्ह्य़ू’ मिळाले आहेत. दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी अमानुष सामुहिक बलात्काराच्या घटनेच्या काही दिवस आधी ती अमेरिकेत परतली. या घटनेने आपल्याला भारतात काय त्रास सहन करावा लागली याची कल्पना सहकाऱ्यांना आल्याचे क्रॉसचे म्हणणे आहे.  
छेडछाडीच्या सातत्याच्या प्रकारांमुळे अमेरिकेत परतल्यावर भारतामधील जे सांस्कृतिक आणि इतर सुंदर अनुभवांबाबत बोलणेही तीला अवघड गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा