वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
चीनबरोबर होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका चिनी मालावरील आयातशुल्क कमी करण्याचा विचार करेल अशी माहिती या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी बुधवारी दिली. आयातशुल्काविषयी कोणतीही कार्यवाही या वाटाघाटींच्या अनुषंगाने केली जाईल, ती एकतर्फी नसेल असेही या सूत्रांनी सांगितले. दोन्ही देशांदरम्यान लांबलेली व्यापारी पुन्हा सुरू होण्यापूर्वी आयातशुल्क कमी केले जाईल असे संकेत दिले जात आहेत. मात्र, ट्रम्प प्रशासनाने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी मालावर १४५ टक्के आयातशुल्काची घोषणा आहे. त्यात कपात करून तो ५० टक्के ते ६५ टक्के इतका कमी केला जाईल असे सूत्रांनी सांगितले. चीनबरोबरचा तणाव कमी करण्यासाठी ट्रम्प प्रशासन चिनी मालावरील आयातशुल्क कमी करण्याचा विचार करत आहे असे वृत्त ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केले आहे. याविषयी चर्चा अजूनही सुरू आहे आणि विविध पर्यायांचा विचार केला जात आहे असे जर्नलच्या वृत्ताच्या नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर सूत्रांनी व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांचा हवाला देऊन वरीलप्रमाणे माहिती दिली.
मात्र या घडामोडींसंबंधी व्हाइट हाऊसने याविषयी तातडीने प्रतिक्रिया दिलेली नाही.