Women Won Lottery After She Saw Numbers In Dream : अमेरिकेतील एका महिलेने नुकतेच सुमारे ४० लाख रुपयांची लॉटरी जिंकली आहे. यामध्ये आश्चर्यकारक गोष्ट अशी की, या महिलेला लॉटरीबाबत एक स्वप्न पडले होते. त्यानंतर महिलेने स्वप्नातील नंबरचीच लॉटरी घेतली आणि ती सुमारे ४२ लाख रुपये जिंकली.

ही लॉटरी जिंकल्यानंतर या विजेत्या महिलेचा मेरीलँड लॉटरीच्या अधिकाऱ्यांशी संवाद झाला होता. त्यावेळी तिने अधिकाऱ्यांना सांगितले की, तिला डिसेंबरमध्ये एक स्वप्न पडले होते. ज्यामध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम होता. त्यानंतर या विजेत्या महिलेने ९-९-०-०-० या क्रमांकांचे तिकीट खरेदी केले आणि ती जिंकली.

हे काही खरे वाटले नाही..

या विजेत्या महिलेने असेही सांगितले की, “लॉटरीची शेवटची तारीख जवळ आली होती. तरी मी तिकिट खरेदी केले नव्हते. पण मी मला स्वप्नात दिसलेल्या नंबरचे तिकिट घेण्यावर ठाम होते. आम्ही तिकिट घेतल्यानंतर शेवटी २० डिसेंबरला याची सोडत झाली आणि मला विजेती घोषित करण्यात आले.”

दरम्यान विजेत्या महिलेने याबाबत तिच्या पतीला सांगितेल तेव्हा त्याने हे खरे मानले नाही. तो म्हणाला, “माझ्या पत्नीने मला ती लॉटरी जिंकल्याचे सांगितले, पण हे काही मला खरे वाटले नाही.”

हे ही वाचा : Kerala Horror : पाच वर्षांत ६४ जणांकडून लैंगिक अत्याचार, केरळमध्ये क्रौर्याची परिसीमा; व्हिडिओही केले होते व्हायरल!

इतक्या पैशाचे काय करायचे?

ही लॉटरी जिंकल्यानंतर इतक्या पैशाचे काय कारायचे आणि ते कुठे खर्च करायचे याचा प्रश्न विजेती महिला आणि तिच्या पतीला पडला आहे. असे असले तरी, “या पैशाचे पत्नीने तिला जे हवे ते करावे”, असे पतीने म्हटले आहे.

हे ही वाचा : Ramdas Athawale : रामदास आठवलेंचा पक्षही दिल्लीच्या मैदानात, विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले १५ उमेदवार

दरम्यान स्वप्नात लॉटरी जिंकल्याचे पाहिल्यानंतर लॉटरी तिकिट खरेदी करून ती जिंकण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेकांना या प्रकारच्या घटना अनुभव्याल असून, ते खरोखर लॉटरीही जिंकले आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये सिंगापूरमध्येही असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. तिथे भारतीय वंशाचा एक व्यक्ती रातोरात करोडपती झाला असून, त्याने ८.४ कोटी रुपये जिंकले होते.

Story img Loader