अमेरिकेतील टेक्सासमध्ये ९ वर्षाच्या चिमुरडीला शाळेत पॉर्न बघताना पकडल्याची घटना समोर आली आहे. ती पॉर्न का बघत होती याचे उत्तर त्या चिमुरडीने दिले असून तिचे उत्तर ऐकून शिक्षकांनाही धक्का बसला. पित्याने त्या चिमुरडीवर अत्याचार केले होते आणि त्यांनी रात्री नेमके काय केले हे जाणून घेण्यासाठी ती पॉर्न बघत होती. मन सुन्न करणाऱ्या या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून पीडितेच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.
टेक्सासमधील एका शाळेत शिकणारी नऊ वर्षाची चिमुरडी आयपॅडवर पॉर्न बघत होती. हा प्रकार शाळेतील शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या मुलीला जाब विचारला. पण त्या चिमुरडीचे उत्तर ऐकून शिक्षकही हादरून गेले होते. “माझे बाबा मला रात्री झोपू देत नाही, ते मला त्रास देतात’ असे तिने सांगितले. सविस्तर चौकशी केल्यानंतर पीडित मुलीवर तिचे वडील लैंगिक अत्याचार करत असल्याचे समोर आले. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरु होता.
बाल सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांशी शाळेने संपर्क साधला. त्यांनी पीडित मुलीची भेट घेऊन ती पॉर्न का बघत होती याची चौकशी केली. तिने अधिकाऱ्यांसमोर सर्व घटनाक्रम सांगितला. यानंतर पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली असून पीडित मुलीच्या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. ३१ वर्षीय नराधम पित्याने मुलगी आठ वर्षाची असल्याासून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. या गुन्ह्यात दोषी आढळल्यास नराधम पित्याला किमान २५ वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.