मुंबईवरील २००८ सालच्या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा मिळावी अशी आमची इच्छा असून, या संदर्भात भारताला आम्ही हवी ती मदत करू असे अमेरिकेने म्हटले आहे.
मुंबई हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा मिळालेली आम्हाला पाहायची आहे आणि त्यामुळे या कामी भारतीय अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी आवश्यक असेल ते सर्व आम्ही करू, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किरबी म्हणाले. डेव्हिड हेडली याला मुंबईतील न्यायालयाने माफीचा साक्षीदार केल्याबद्दल त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती.
हेडली या हल्ल्याबाबत फार मोठी माहिती पुरवू शकतो असे सांगितले असता किरबी म्हणाले की, अशी कुठलीही निश्चित माहिती माझ्याजवळ नाही आणि सध्या न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणावर मी भाष्य करणे योग्यही नाही. मात्र भारत हा आमचा जवळचा मित्र आणि भागीदार आहे. त्यामुळे मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यातील दोषींना शिक्षा मिळावी असे आम्हालाही वाटत असल्याचे किरबी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usa support to india about terror attack