अमेरिकेतील आजवरचे सर्वात भव्य असे मंदिर लॉस एंजेलिस येथील हॉलीवूडजवळ साकारले असून तब्बल १० कोटी डॉलर खर्चून श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने उभारलेले हे मंदिर अल्पावधीतच भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाले आहे. या मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे कारागिरांनी कोरीवकाम केलेल्या ३५ हजार इटालियन आणि भारतीय संगमरवरी शिलाखंडांचा वापर या मंदिरात केला आहे. या मंदिरात पाच मध्यम तर दोन भव्य कळस, चार सज्जा तसेच १२२ खांब आणि १२९ कमानी आहेत. मंदिरातील ६ हजार ६०० संगमरवरी शिलाखंडांवर हिंदू संस्कृतीतील प्रेरक प्रसंग कोरले गेले आहेत. भूकंपरोधक तंत्राचा वापर करून उभारलेले जगातले हे पहिले मंदिर असून ते एक हजार वर्षे टिकेल, असा दावा स्वामीनारायण संस्थेने केला आहे. २० एकर परिसरातील या मंदिराच्या आवारात कमळाच्या आकाराचा ९१ फुटी तलाव असून सांस्कृतिक केंद्र, व्यायामशाळा व अभ्यासवर्गही आहे. मंदिरासाठी लागणारी वीज मुख्यत्वे सौरऊर्जेद्वारे मिळविली गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा