सरकार देशभरातील सर्व स्वस्त धान्य दुकाने (रेशन दुकाने) मार्च २०१९ पर्यंत संगणकीकृत करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी राज्यसभेत सांगितले. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील गैरप्रकार रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार असल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक वितरण व्यवस्था थेट अनुदान हस्तांतर योजनेंर्गत आधारशी संलग्न करण्याचा प्रयोग प्रायोगित तत्त्वावर पुदुच्चेरी व हरयाणा यांनी शहरी भागात सुरू केला आहे. देशभरात त्याचा विस्तार केला जाणार आहे. देशभरात ५ लाख ३५ हजार स्वस्त धान्य दुकाने असून, त्यामध्ये मार्च २०१६ पर्यंत सरकारने ९१ हजार इलेक्ट्रॉनिक यंत्रे बसवली असून, त्या आधारे विक्रीचा तपशील मिळतो असे पासवान यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सांगितले. विविध राज्यांमधील प्रयोगांच्या आधारे देशभरात त्याची अंमलबजावणी करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे पासवान यांनी सांगितले. आतापर्यंत पावणेचार लाख बोगस रेशन कार्ड असल्याचे उघड झाल्याचे सांगितले.
देशभरातील रेशन दुकानांचे तीन वर्षांत संगणकीकरण
सरकार देशभरातील सर्व स्वस्त धान्य दुकाने (रेशन दुकाने) मार्च २०१९ पर्यंत संगणकीकृत करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी राज्यसभेत सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-03-2016 at 00:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use computer on ration shop