एका अज्ञात व्यक्तीने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या विक्रीची जाहिरात ऑनलाईन संकेतस्थळावर टाकल्याने खळबळ उडाली आहे. इबे या अमेरिकन ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळावर हा प्रकार घडला. बिनकामाचे पाकिस्तानी पंतप्रधान विकणे आहे, किंमत ६६,२०० पौंड असा मजकूर या जाहिरातीत लिहिण्यात आला आहे. वापरून झालेले पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ विकणे आहे. हे उत्पादन अनुवांशिकरित्या सदोष आहे. सध्या चालू अवस्थेत नाही, कधीच नव्हते, असेदेखील या जाहिरातील म्हटले आहे. ‘युझलेस पाकिस्तानी पीएम फॉर सेल’ या नावाने ही जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. ही जाहिरात झळकल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले.

इबेवरील जाहिरात
युजलेस पाकिस्तानी पीएम फॉर सेल
किंमत- ६२लाख
स्थिती – नवीन परंतु दोषयुक्त
डिलिव्हरी ऑप्शन – भारतात डिलिव्हरी नाही

Ebay

Story img Loader