Uttar Pradesh Bypoll Election 2024 Samajwadi Party Candidates List : उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभेच्या १० जागंवर पोटनिवडणूक होणार आहे. यापैकी सहा जागांवर समाजवादी पार्टीने त्यांचे उमेदवारी जाहीर केले आहेत. यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे म्हणाले, “समाजवादी पार्टीने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीशी कोणत्याही प्रकारची चर्चा केलेली नाही. तसेच त्यांनी उमेदवारांची नावं जाहीर करण्याआधी आम्हाला विश्वासात घेतलं नाही”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अविनाश पांडे म्हणाले, “समाजवादी पार्टी उमेदवारांची नावं जाहीर करणार असल्याचं आम्हाला कळवण्यात आलं नव्हतं. आम्ही सध्या तरी त्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही किंवा विरोध करणार नाही. इंडिया आघाडीची समन्वय समिती याबाबत घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटी कोणताही विरोध न करता इंडिया आघाडीचे निर्णय मान्य करेल.

हे ही वाचा >> Indian Food System : भारतीय खाद्यपदार्थ जगभरातील देशांपेक्षा सर्वोत्तम, तर ‘या’ देशातील अन्न सर्वात खराब; ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’च्या अहवालात काय म्हटलं?

काँग्रेसचं नेमकं म्हणणं काय?

अविनाश पांडे म्हणाले, “आम्ही लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे. उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीवर लोकांनी विश्वास दर्शवला, म्हणून आम्ही अति आत्मविश्वासात अजिबात नाही. मात्र आम्ही आश्वस्त आहोत की आमची संघटना मजबूत होत आहे. आम्ही संघटना अधिक मजबूत व सशक्त बनवण्यासह निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे. आघाडीच्या शक्यता शेवटपर्यंत कायम असतील. आम्ही यापुढेही इंडिया आघाडी म्हणून निवडणुकांना सामोरे जाऊ”.

हे ही वाचा >> Balochistan Attack : पाकिस्तानात रक्तरंजित रात्र! बलूचिस्तानमध्ये बंदूकधाऱ्यांकडून २० खाणकाम मजुरांची हत्या

काँग्रेसने हरियाणा राज्य भाजपाला सुपूर्द केलं; सपाची टीका

दरम्यान, समाजवादी पार्टीचे नेते व आमदार रविदास मेहरोत्रा यांनी म्हटलं की “या सर्व जागांवर भाजपाला पराभूत करण्यात समाजवादी पार्टी आघाडीवर राहिली आहे. त्या आमच्या जागा आहेत. त्यामुळे आम्ही तिथे आमचे उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित चार जागांवर आमची काँग्रेस पक्षाशी बातचीत चालू आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही आघाडी करू. हरियाणात काँग्रेसने सपा व आम आदमी पार्टीला आपल्याबरोबर घेतलं असतं तर तिथे कदाचित वेगळे निकाल लागले असते. परंतु, काँग्रेसने तिथे सपाला एकही जागा दिली नाही. उलट संपूर्ण राज्य भाजपाला सुपूर्द केलं. आम्हाला उत्तर प्रदेशात भाजपाला पराभूत करायचं आहे. त्यामुळे आम्ही सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उर्वरित जागांवर आम्ही नक्कीच काँग्रेसशी चर्चा करू”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh bypoll election 2024 samajwadi party candidates list congress reacts asc