उत्तर प्रदेशमध्ये आज प्रशासकीय सेवा(यूपीएससी)च्या प्रश्नपत्रिका परिक्षा सुरू होण्याआधीच पेपर फुटण्याची घटना घडली आहे. लखनौ विभागात पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवरून प्रसिद्ध झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
परिक्षा सुरु होण्यापूर्वी सदर परिक्षेचा पेपर व्हॉट्स अॅपवरून लीक झाला. व्हॉट्स अॅपवरून फिरत असलेला पेपर हा मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळला आहे. यासंबंधी आम्ही मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना माहिती दिली आहे, असे पोलिस महासंचालक ए के जैन यांनी सांगितले. यासाठी एसटीएफला देखील कामाला लावले असून, याविषयाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेशातील २० जिल्ह्यांत ९१७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत होती.
उ. प्रदेशात पेपर फुटल्याने ‘यूपीपीएससी’ची पात्रता परीक्षा रद्द
उत्तर प्रदेशमध्ये आज प्रशासकीय सेवा(यूपीएससी)च्या प्रश्नपत्रिका परिक्षा सुरू होण्याआधीच पेपर फुटण्याची घटना घडली आहे.
First published on: 29-03-2015 at 05:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh civil services prelims paper allegedly leaked probe on