उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेच्या माध्यमातून नवविवाहित जोडप्यांना आर्थिक मदतीचा लाभ दिला जातो. या योजनेत अनेक गैरव्यवहार होतात. त्यातला एक प्रकार समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सामूहिक विवाह सोहळ्यात जोडप्याना अनुदान आणि गृहपयोगी वस्तूंचे वाटप केले जाते. यात गैरव्यवहार करण्यासाठी अनेक एजंट सक्रिय आहेत. या एजंट्सनी चक्क बहिण-भावाचेच लग्न लावून दिल्यामुळं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यातील बहिणीचं आधीच लग्न झालेलं होतं. तरीही तिच्याशी भावाची लग्नगाठ बांधून गैरव्यवाहर केला गेला.

उत्तर प्रदेशमध्ये आर्थिक मागास घटकातील लोकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना सुरू करण्यात आली. या योजनेतील भ्रष्टाचाराच्या अनेक सुरस कथा अधूनमधून बाहेर येत असतात. नुकतंच महाराजगंज या जिल्ह्यातील एक घटना समोर आली आहे. मध्यस्थी करणाऱ्या एका एजंटने योजनेचं अनुदान लाटण्यासाठी बहिण-भावालाच बोहल्यावर चढवलं. यानंतर या दोघांना ३५ हजार रुपयांचे अनुदान आणि गृहप्रयोगी वस्तू मिळाल्या.

no alt text set
Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”
pm narendra modi brazil
‘वसुधैव कुटुंबकम’ यावेळीही समर्पकच, ब्राझीलमधील ‘जी२०’ शिखर परिषदेत…
Indian Coast Guard :
Indian Coast Guard : Video : पाकिस्तानी जहाजाचा दोन तास पाठलाग; ७ मच्छिमारांची भारतीय तटरक्षक दलाने ‘अशी’ केली सुटका
action by ED in Santiago Martin
Santiago Martin : ईडीची मोठी कारवाई, २२ ठिकाणी छापे; तब्बल १२ कोटींची रोकड जप्त
Manipur Violence
Manipur Violence : मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘सीएपीएफ’च्या ५० तुकड्या पाठवण्यात येणार
Fareed Zakaria on Express Adda
फरिद झकारिया एक्स्प्रेस अड्डावर, पाहा विशेष मुलाखत
no alt text set
Viral Video :…अन् कार्यकर्त्यांची तुंबळ हाणामारी जागेवर थांबली! सामाजिक भान जपणाऱ्या केरळमधील दोन राजकीय गटांचा Video चर्चेत
Narendra Modi in Nigeria
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
no alt text set
Ragging in Medical College : रॅगिंगमुळं भंगलं डॉक्टर होण्याचं स्वप्न! तीन तासांच्या छळवणुकीनंतर विद्यार्थ्याचा मृत्यू

सीमा हैदर प्रकरणाची पुनरावृत्ती: युपीतल्या तरुणासाठी इराणी तरुणीचा भारतात प्रवेश; म्हणाली, “पहिलं अयोध्येत जाऊन…”

५ मार्च रोजी महाराजगंज जिल्ह्यातील लखीमपूर मंडळात ३८ जोडप्यांचं सामूहिक विवाह सोहळ्याच्या योजनेअंतर्गत लग्न लावून देण्यात आलं. यावेळी वर्षभरापूर्वीच लग्न झालेल्या एका महिलेला सरकारी अनुदानासाठी पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी तयार करण्यात आलं. पण लग्नाच्या दिवशी अचानकपणे ठरलेला नवरा मंडपात पोहचू शकला नाही. त्यामुळे अडचणीत आलेल्या एजंट्सनी महिलेच्या भावालाच नवरा म्हणून उभं केलं आणि प्रथा-परंपरेनुसार त्यांच्यात विवाह सोहळा संपन्न झाला.

“फक्त नमाज अदा करणं हे हिंसाचाराचं कारण..”, विदेशी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर गुजरातच्या कुलगुरुंचं विधान

उत्तर प्रदेश पोलिसांनी काय कारवाई केली?

सदर संतापजनक प्रकरण समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशचे प्रशासन खडबडून जागे झाले. प्रांत विकास अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून जोडप्याला लग्नात देण्यात आलेल्या वस्तू परत मागतिल्या आहेत. तसेच अनुदानाच्या स्वरुपात दिले जाणारे ३५ हजार रुपयांचा धनादेश देऊ नये, असे आदेश दिले. लक्ष्मीपूरचे प्रांत अधिकारी अमित मिश्रा यांनी सांगितले की, ५ मार्च रोजी पार पडलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यातील बनाव आमच्यासमोर आल्यानंतर आम्ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.