गेल्या आठवड्यात एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या घरामधील अवैध बांधकामावर प्रशासनाने बुलडोझर चालवला आहे. आपण भाजपा कार्यकर्ता असल्याचा दावा करणारा श्रीकांत तिवारी नोएडामधील एका हाऊसिंग सोसायटीत राहतो. महिलेला शिवीगाळ तसंच गैरवर्तन केल्यामुळे तो चर्चेत आला होता.
सोसायटीमधील एका महिलेने श्रीकांत त्यागीला अतिक्रमण केल्याबद्दल जाब विचारला होता. यामुळे संतापलेल्या श्रींकात त्यागीने कथितपणे महिलेला शिवीगाळ तसंच मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत होता. यानंतर आज नोएडा पोलीस सोसायटीत पोहोचले. यावेळी बुलडोझरच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्यत आलं.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर…
बुलडोझर चालवल्यानंतर सोसायटीमधील रहिवासी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त करु लागले. एका रहिवाशाने म्हटलं आहे की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईबद्दल आम्ही आनंदी आहोत. त्याने केलेलं अतिक्रमण आणि वागणूक यामुळे आम्हाला त्रास होत होता”.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितलं की “मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली होती. आम्ही आरोपीला असं मुक्तपणे फिरु देणार नाही. कायदा मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल”.
श्रीकांत त्यागी सध्या फरार असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१९ मध्ये ग्रॅण्ड ओमेक्स असोसिएशन ऑफ अपार्टमेंट ओनर्सने नोएडा प्रशासनाला पत्र लिहून श्रीकांत त्यागीने केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये प्रशासनाने नोटीस पाठवली होती. भाजपाने मात्र श्रीकांत त्यागीपासून अंतर ठेवलं होतं. त्यागी भाजपा सदस्य नसल्याचा त्यांचा दावा आहे.
श्रीकांत त्यागी याने सोसायटीच्या पार्कवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलं होतं. यामुळे इतर रहिवाशांना त्रास होत होता. अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस देण्यात आल्यानंतरही आपल्या पदाचा गैरवापर करत त्याने नकार दिला होता.
गेल्या आठवड्यात एका महिलेने श्रीकांत त्यागीकडून झाडं लावण्यात येत असल्याने विरोध दर्शवला होता. मात्र त्याने आपला हक्क असल्याचं सांगत महिलेला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.