Uttar Pradesh Train Accident Lakhimpur Kheri : उत्तर प्रदेशच्या लखीमपूर-खेरी भागात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका कुटुंबातील तीन सदस्य रेल्वे रुळावर उभे राहून इन्स्टाग्राम रील चित्रीत करत होते. मात्र, रेल्वेच्या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये पती-पत्नी व त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. खेरी पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली आहे. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बुधवारी सकाळी लखनौहून पिलीभीतकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनच्या धडकेत या तिघांचा जीव गेला आहे. खेरीजवळ ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीतापूरमधील लहरपूर येथील मोहल्ला शेख सराय येथे वास्तव्यास असलेलं एक जोडपं रेल्वे रुळावर रील चित्रीत करत होतं. मोहम्मद अहमद (३०) व त्याची पत्नी नाजमीन (२४) हे दोघे त्यांचा दोन वर्षांचा मुलगा अक्रमला मांडीवर घेऊन ते रेल्वे पुलाजवळ रील शूट करत होते. मात्र त्यांना रेल्वे आल्याचं समजलं नाही. तिघेही रेल्वेखाली चिरडले गेले.

हे ही वाचा >> Rape in Goa : गोव्यात ४ वर्षीय युरोपिअन चिमुरडीवर बलात्कार, पोलिसांकडून बिहारच्या बांधकाम कामगाराला अटक!

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खेरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्वरित तिन्ही मृतदेह रेल्वे रुळावरून बाजुला केले व शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलीस याप्रकरणी अधिक माहिती गोळा करत आहेत.