Uttar Pradesh Encounter in Ghazipur Main conspirator of murder of two RPF constables : महाराष्ट्रापाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही एक गुन्हेगार पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाला आहे. बदलापूरमधील खसगी शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी अक्षय शिंदे हा चकमकीत ठार झाला आहे. त्याने एका पोलिसाकडील बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला, प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील त्याच्यावर गोळीबार केला. त्या गोळीबारात शिंदे जागीच ठार झाला. पाठोपाठ उत्तर प्रदेशात अशीच एक घटना घडली आहे. गाझीपूरमध्ये आरपीएफच्या दोन हवालदारांना धावत्या रेल्वेतून बाहेर फेकण्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी ठार झाला.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने, नोएडा व गाझीपूर पोलिसांनी मिळून या आरोपीला पकडण्यासाठी एक संयुक्त मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान पोलीस चकमक होऊन त्या चकमकीत आरोपी गोळी लागून ठार झाला आहे. पोलिसांनी जखमी अवस्थेत आरोपीला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. जाहिद मोहम्मद उर्फ सोनू असं या आरोपीचं नाव होतं. त्याच्यावर पोलिसांनी एक लाख रुपयांचं बक्षीस देखील ठेवल होतं.

UP CM Yogi Adityanath
Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांना हरियाणा, जम्मू-काश्मीरच्या प्रचारापासून भाजपाने दूर का ठेवले?
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
Thackeray group alleges that police are ready to implicate Deepak Badgujar in Ambad firing case
अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप
Married Man Marries 15 Women in seven Indian States
Crime News : आधुनिक लखोबा! १५ जणींशी लग्न, सात राज्यांमधल्या बायकांना प्रायव्हेट फोटो दाखवून करायचा ब्लॅकमेल
Lucknow building collapse,
Lucknow Building Collapse : उत्तर प्रदेशमध्ये तीन मजली इमारत कोसळली; पाच जणांचा मृत्यू, २४ जखमी; २८ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश
Forest department succeeds in rescued fox in Jamkhed
जामखेडमध्ये मुक्त संचार करणाऱ्या कोल्ह्यास पकडण्यात वनविभागाला यश
chhattisgarh police managed to kill 9 Naxalites
छत्तीसगडमधील चकमकीत एका जहाल नेत्यासह ९ नक्षलवादी ठार
Bullock carts and horses also on the road in protest against potholes in Nashik
नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधातील आंदोलनात बैलगाडी, घोडेही रस्त्यावर

हे ही वाचा >> Bengaluru Women Murder: बंगळुरूतील ‘फ्रिज’ हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट; पीडितेच्या पतीनं प्रियकर अश्रफवर व्यक्त केला संशय

जाहिदवर एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार गाझीपूरच्या दिलदारनगर परिसरात ही पोलीस चकमक झाली. जाहिद मोहम्मद हा या भागात मद्य तस्करी करणाऱ्या टोळीबरोबर काम करत होता. चकमकीनंतर पोलिसांनी त्याच्याकडील एक अवैध पिस्तूल, पिस्तुलातील गोळ्यांची दोन मॅगझिन्स व अवैध देशी दारू जप्त केली आहे. आरपीएफ हवालदारांच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील पहिला आरोपी प्रेमचंद वर्मा याला २८ ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यानंतर बिलेंद्र पासी, रवी कुमार, विनय, पंकज व रवीपुत्र बिंदेश्वरी या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपी जाहिद अनेक दिवसांपासून फरार होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

हे ही वाचा >> Israeli vs Lebanon : इस्रायलचा लेबनॉनवर एअर स्ट्राईक, ४९२ जण ठार, १६४५ जखमी; हेझबोलाला नेस्तनाबूत करण्यासाठी नेतन्याहूंची योजना तयार, आता थेट…

पोलीस गेल्या महिनाभरापासून जाहिदच्या मागावर होते. अशातच जाहिद दिलदारनगरमध्ये असल्याची माहिती खबऱ्यांकडून त्यांना मिळाली होती. त्यानंतर एसटीएफ, नोएडा पोलीस व गाझीपूर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम हाती घेतली. मात्र, पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जाहिदने गोळीबार केला. त्याच्या प्रत्यत्तरात पोलिसांनी देखील त्याच्यावर गोळीबार केला. या चकमकीत तो ठार झाला.