Uttar Pradesh Ghaziabad Cylinder Blast News : गाझियाबादमध्ये शनिवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. येथील भोपुरा चौकाजवळ गॅस सिलिंडर्स वाहून नेणाऱ्या ट्रकला मोठी आग लागली आहे. या आगीमुळे ट्रकमधील सिलिंडर्सचे स्फोट झाले. या स्फोटांचा आवाज दोन ते तीन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. येथील रहिवाशांनी स्फोटांचा आवाज ऐकून व आगीचे लोळ पाहून अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्याचं काम सुरू केलं. या घटनेचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. आगीचं हे दृश्य खूप भयावह आहे. त्यामुळे आजूबाजूचे रहिवासी घाबरले आहेत. स्थानिकांनी सांगितलं की सुरुवातीला सिलिंडर स्फोटांचे आवाज येण्यास सुरुवात झाली तेव्हा असं वाटत होतं की बॉम्बस्फोट चालू आहेत. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की ट्रकमध्ये १५० सिलिंडर असण्याचा अंदाज आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा