नवी दिल्ली : उत्तर प्रदेशबरोबरच उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांचा कौल आज, गुरुवारी स्पष्ट होईल़  मतमोजणी सकाळी सुरू होऊन दुपापर्यंत कल स्पष्ट होईल़ 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये उत्तर प्रदेशात भाजप सत्ता कायम राखेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  मात्र, आपल्याला बहुमत मिळेल, असा विश्वास प्रतिस्पर्धी सप आघाडीला आह़े  पंजाबमध्ये सत्तांतर, तर उत्तराखंड आणि गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात रस्सीखेच होण्याचा अंदाज चाचण्यांनी वर्तवला आह़े  निकालोत्तर राजकीय जुळवाजुळव करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपचे बडे नेते या राज्यांत तळ ठोकून आहेत़  त्यामुळे आता प्रत्यक्षात कौल कोणाला मिळतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आह़े

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh five states namely uttarakhand punjab goa and manipur big leaders of congress and bjp akp