कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देऊन जिल्हा प्रशासनाने एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने गुरुवारी शहरात होणारा त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याच्या सपा सरकारच्या निर्णयावर एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. उत्तर प्रदेश सरकारने अल्पसंख्याकांसाठी काहीही केले नसल्याने त्यांना ओवेसी यांची भीती वाटत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
‘भारतमाता की जय’ असे म्हणण्यास नकार दिल्याने ओवेसी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हा पसंतीचा प्रश्न आहे, त्याची कोणावरही सक्ती करता येणार नाही, असे मत ओवेसी यांनी व्यक्त केले होते.
ओवेसी गुरुवारी लखनऊ भेटीवर येणार होते आणि त्यांची सभाही आयोजित करण्यात आली होती, मात्र जिल्हा प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देऊन कार्यक्रमाला परवानगी नाकारली. ओवेसी लखनऊला भेट देऊ शकतात, असे जिल्हा दंडाधिकारी जे. एस. दुबे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा