उत्तर प्रदेशमधील मुस्लिम महिलांनी वाराणसी येथील एका हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण केले आहे. त्याचबरोबर या महिलांनी तिहेरी तलाकपासून मुक्ती मिळावी अशी देवाजवळ प्रार्थना केली. सुमारे २० महिला आज (दि.१०) सांयकाळी हनुमान मंदिरात पोहोचल्या आणि तेथील पुजारीला मंदिरात पूजा करण्याची इच्छा प्रकट केली.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार बुरखा घातलेल्या या महिलांनी मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केले. ज्या ठिकाणी बसून या महिला हनुमान चालिसाचे पठण करत होते. तिथे तिहेरी तलाकपासून मुक्ती मिळो, असे पोस्टर चिटकवण्यात आले होते.

 

ऑल इंडिया मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्डच्या अध्यक्षा शाइस्ता अंबरसहित अनेक मुस्लिम महिलांच्या संघटना तिहेरी तलाकचा विरोध करत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीवर शाइस्ता अंबर यांनी मुस्लिम महिलांचा वापर फक्त सुखासाठी केला जातो. आणि सकाळी तलाक दिला जातो, अशी टीका त्यांनी केली होती. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत तिहेरी तलाक मुद्द्याचा वापर प्रचारात करण्यात आला होता. अनेक महिलांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्याय मागितला आहे.

Story img Loader