उत्तर प्रदेशमधील लखनौमधील हजरतगंज परिसरातील एक चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी (२४ जानेवारी) संध्याकाळी ही घटना घडली. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. मृत महिलांची नावे बेगम हैदर (७२) आमि उझमा असे असून हैदर या समाजवादी पक्षाचे प्रवक्ते झिशान हैदर यांच्या आई आहेत. तर उझमा या तेथील वरिष्ठ पत्रकाराच्या कन्या आहेत.

बचावपथकाने त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते

मंगळवारी संध्याकाळी चार मजली इमारत अचानकपणे कोसळल्यानंतर युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले होते. या दुर्घटनेत बैगम हैदर आणि उझमा या गंभीर जखमी झाल्या होत्या. बचावपथकाने त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते. तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी शोक व्यक्त केला आहे. हैदर आणि उजमा यांच्यासह एकूण १६ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले होते. हैदर आणि उजमा यांचा मृत्यू झाला असून उर्वरित सर्व जखमींवर लखनौ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली, याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या इमारतीत एकूण १२ फ्लॅट्स होते.

Story img Loader