Uttar Pradesh 19 year old Girl Dead body Found in Hostel : उत्तर प्रदेशमधील लखनौमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विधी (लॉ) विद्यापीठात एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या विद्यापीठाच्या वसतीगृहातील एका खोलीत १९ वर्षीय विद्यार्थिनी बेशुद्धावस्थेत आढळली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या विद्यार्थिनीचे वडील आयपीएस अधिकारी आहेत. अनिका रस्तोगी असं या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. ती लखनौच्या आशियाना येथील राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठात एलएलएबीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की अनिका वसतीगृहातील तिच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळली होती. ती जमिनीवर पडली होती. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अनिकाच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

हे ही वाचा >> Howrah Hospital : पश्चिम बंगालच्या रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार, सीटीस्कॅन केंद्रात अल्पवयीन मुलीचा कर्मचाऱ्याकडून विनयभंग!

विद्यार्थिनीच्या मृत्यूचं कारण काय?

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की अनिकाच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे ते अद्याप समजू शकलं नाही. तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त केला जात आहे. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. अनिकाच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर कळू शकेल, असं पोलीस म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh ips officer daughter found dead in hostel room in lucknow university asc