Uttar Pradesh Kushinagar News : उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यात एक मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. कुशीनगरमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीचं हॉस्पिटलचं चार हजारांचं बिल भरण्यासाठी आपल्याच मुलाला २० हजार रुपयांना विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गर्भवती पत्नीला आणि नवजात मुलाचं हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत नव्हता. त्यामुळे वडिलांनी आपल्या दुसऱ्या तीन वर्षांच्या एका मुलाला २० हजार रुपयांना विकलं. या घटनेनंतर उत्तर प्रदेशमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

नेमकी घटना काय घडली?

उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या गर्भवती पत्नीला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मात्र, त्यानंतर पत्नीला आणि नवजात बाळाला खासगी हॉस्पिटलमधून घरी घेऊन जाण्यासाठी हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी त्यांच्याकडे चार हजार रुपये नव्हते. मात्र, हॉस्पिटलचं बिल भरल्याशिवाय पत्नीला आणि नवजात बाळाला डिस्चार्ज देण्यास हॉस्पिटलने नकार दिला. त्यामुळे त्या हाताश झालेल्या व्यक्तीने आपल्या २ वर्षाच्या दुसऱ्या निरागस मुलाला विकण्याचा निर्णय घेतला.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Malegaon ed investigation 125 crore rupees scam
मालेगावातील कोटींच्या उड्डाणांची ईडी चौकशी
deceased Raghunandan Jitendra Paswan
बिहारी तरुणाची मुंबईत हत्या; आंतरधर्मीय संबंधांतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

हेही वाचा : Lucknow Building Collapse : उत्तर प्रदेशमध्ये तीन मजली इमारत कोसळली; पाच जणांचा मृत्यू, २४ जखमी; २८ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश

यानंतर त्या व्यक्तीने आपल्या २ वर्षाच्या मुलाला २० हजार रुपयांमध्ये विकले. मात्र, यावेळी कोणालाही संशय येऊ नये म्हणून मुलगा विकत घेणाऱ्यांनी मुलगा दत्तक दिला आहे, असं वाटावं म्हणून एका पत्रकावर सही घेतल्याची माहिती सांगितली जात आहे. यानंतर त्या पतीने आपल्या पत्नीचे आणि नवजात बाळाचं हॉस्पिटलचं ४ हजार रुपयांचं बिल भरलं आणि पत्नीला व बाळाला हॉस्पिटलमधून घरी नेलं. या घटनेची माहिती मिळताच आईला रडू कोसळलं.

दरम्यान, यानंतर या घटनेची गावात चर्चा झाली आणि यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. हे जोडप मोलमजुरीचं काम करत असल्याचं स्थानिक गावकरी सांगतात. त्यांना ६ अपत्य असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यांचं पालनपोषण ते मोलमजुरी करून करतात. दरम्यान, या घटनेबाबत सोशल मीडियावरही काही पोस्ट व्हायरल झाल्या आणि संतापाची लाट उसळली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता ही धक्कादायक घटना समोर आली.

यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी मुलाला घेऊन जाणाऱ्या जोडप्यासह पाच जणांना अटक केली. तसेच हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी मुलाला विकण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांनी हॉस्पिटलमधील दोघांना अटक केली असून मुलाची विक्री करणारा मध्यस्थ आणि मुलाला विकत घेणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.