उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. येथे वकिलांच्या एका गटानं जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
महाराजगंज तहसील कार्यालयात ही घटना घडली आहे. दुर्गेश सिंग असं मारहाण करण्यात अधिकाऱ्याचं नाव आहे. वकील दुर्गेश सिंह यांची तक्रार करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे गेले होते. तेव्हा, सिंग यांनी वकीलांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यातून वकीलांचा गट संतप्त झाला.
यानंतर वकीलांच्या गटानं दुर्गेश सिंह यांना बेदम मारहाण केली. यावेळी वकीलांच्या तावडीतून सुटण्याचा सिंह यांनी प्रयत्न केला. पण, वकीलांच्या गटानं लाथा बुक्क्यांनी सिंह यांना जबदरस्त मारहाण केली. यावेळी दुर्गेश सिंह पोलिसाच्या गणवेशात होते.