उत्तर प्रदेशातील लखनौ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सतत स्मार्टफोन वापरत असल्यानं आईने मुलीला खडसावलं. याच रागातून मुलीनं गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनीता असं आत्महत्या केलेल्या तरूणीचं नाव आहे. सुनीता १२ वी च्या वर्गात शिक्षण घेत होती.

हेही वाचा : पती, पैसा अन् मर्डर…पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट; कॉफीमध्ये मिसळले ‘ब्लीच’, घटनेचा VIDEO आला समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुनीता प्रकृतीच्या कारणास्तव कॉलेजला जात नव्हती. त्यामुळे सुनीता सतत फोनवरून मैत्रिणींशी बोलत असे. हीच गोष्ट सुनीताच्या आईला खटकली. यावरून आई सुनीताला ओरडली आणि मोबाईल घेऊन कामावर निघून गेली.

हेही वाचा : १०० रुपयांची हातोडी, १३०० चं डिश कटर घेतलं अन् दागिन्यांचं शोरूम लुटलं, २५ कोटींच्या चोरीचं गूढ उकललं

आई ओडरल्यामुळे सुनीता नाराज झाली होती. तिनं भावाला बाहेर खेळण्यास पाठवलं. त्यानंतर खोलीत गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुनीताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh lucknow class 12 student hangs self after mother scolds her for using phone ssa