देशात सध्या श्रद्धा वालकर खून प्रकरणाने खळबळ उडाली असताना, उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाने १७ वर्षीय मुलीला लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून तुकडे करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडीस आला आहे. मोहम्मद फयाज, असे या तरुणाने नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – UP Madrasas Scholasrship: मदरशांमध्ये शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप रद्द, केंद्राचा मोठा निर्णय

कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी फयाज गेल्या काही दिवसांपासून मुलीला त्रास देत होता. तिने याची माहिती तिच्या कुटुंबियांनाही दिली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी फयाजला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतही त्याने सातत्याने मुलीचा पाठलाग करत लग्नाची मागणी घातली. मात्र, तिने नकार दिल्याने ‘माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुझे तुकडे करेन’, अशी धमकी त्याने दिली.

हेही वाचा – FIFA World Cup 2022: मोरोक्कोविरुद्धच्या पराभवानंतर बेल्जियममध्ये उसळला हिंसाचार, अनेकांना घेतले ताब्यात

दरम्यान, या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर नौबास्ता पोलिसांनी आरोपी फयाजला चमनगंज येथून अटक केली असल्याची माहिती नौबास्ताचे सहाय्यक पोलीस आयुक्त अभिषेक कुमार पांडे यांनी दिली आहे. तसेच त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh man threaten minor girl to cut into pieces after rejects marriage proposal spb