Noida Ganja Trees : अनेकवेळा शेतात गांजाची लागवड केल्याच्या घटना पाहायला मिळतात. अशा स्वरुपाच्या घटना समोर आल्यानंतर गांजाची लागवड करणाऱ्यांवर पोलीस कारवाई देखील करतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने शेतात नव्हे तर चक्क फ्लॅटमध्ये गांजाची झाडं लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई केली आहे.

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील एका पॉश सोसायटीमधील एका फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना एक अनोखा प्रकार आढळून आला. एका व्यक्तीने चक्क फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केली होती. पोलिसांनी अवैधरित्या गांजाची शेती करणाऱ्या या व्यक्तीचा पर्दाफाश केला. याआधी याच शहरातून अशाच प्रकारची घटना आढळून आली होती.

Raj Thackeray
Raj Thackeray : “माझा मुलगा रुग्णालयात असताना हा माणूस विकला गेला”, राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
maharashtra assembly election quiz
Election Quiz: शरद पवार पहिल्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी कोणत्या पक्षाची स्थापनी केली?
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Goa tourism
गोव्यात टॅक्सी माफिया, विदेशी पर्यटकांची संख्या घटली; पर्यटन विभागाने म्हटले, ‘आमची तुलना श्रीलंकेबरोबर करू नका’
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : China Accident : धक्कादायक! भरधाव कारने अनेकांना चिरडलं; ३५ जणांचा मृत्यू, ४३ जण जखमी, दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत याप्रकरणी राहुल नावाच्या एका तरुणाला अटक केली आहे. हा गांजा डार्क वेबच्या माध्यमातून विकला जात होता. आरोपींच्या ताब्यातून काही गांजा आणि विविध साहित्य जप्त करण्यात आलं आहे. एवढ्या प्रगत तंत्रज्ञानाने एका फ्लॅटमध्ये गांजाची लागवड पहिल्यांदाच आढळून आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी या घटनेसंदर्भात माहिती देताना सांगितलं की, अशा पद्धतीने एका फ्लॅटमध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार पहिल्यांदाच आढळून आला आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलीस कसून चौकशी करत आहेत. तसेच हा व्यक्ती हा गांजा नेमकी कुठे विक्री करत होता? यामध्ये आणखी कोण-कोण सहभागी आहे? यासंदर्भातील तपास करण्यात येत आहे.

ग्रेटर नोएडाच्या डीसीपींनी सांगितलं की, या घटनेच्या चौकशीदरम्यान हे उघड झालं की आरोपी इंग्रजी विषयात चांगला तज्ञ आहे. त्यामुळे त्याला इंटरनेटची चांगली जाण आहे. आरोपीने इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून गांजाची लागवड करण्याची पद्धत शिकली. तसेच परदेशी वेबसाइटद्वारे ऑनलाइन ऑर्डर करून गांजाच्या बिया आयात केल्या. त्यानंतर आरोपीने त्याच्या फ्लॅटमध्ये वातानुकूलित यंत्राच्या साहाय्याने विशिष्ट तापमानात गांजाच्या बियांची कुंडीत लागवड करत पीक तयार केले. दरम्यान, ओटीटीवर चित्रपटांमध्ये गांजाच्या लागवडीचा प्रकार पाहून प्रभावित होत फ्लॅटमध्ये गांजाची लागवड केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.