उत्तराखंडमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भाजपा नेत्यानं अल्पवयीनं तरुणीवर अत्याचार केला आहे. याप्रकरणी भाजपा नेत्यावर तरूणीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईनं भाजपा नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत.
उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यात ही घटना घडली आहे. चंपावत हा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. कमल रावत, असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाजपा नेत्याचं नाव आहे.
हेही वाचा : बॉस खिल्ली उडवतो म्हणून कर्मचारी महिलेने घडवली अद्दल! हनी ट्रॅप रचला, नग्न फोटो मिळवले आणि….
पोलीस अधीक्षक देवेंद्र पिंचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कलम ३७६ ( बलात्कार ), ५०६ ( जाणूनबुजून अपमानित करणे ), ५०६ ( धमकी ) आणि पोस्को अंतर्गत कमल रावतवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर न्यायालयात जबाब नोंदवण्यात येईल.”
हेही वाचा : क्लबमध्ये पार्टी, बाहेर आल्यानंतर जोरदार वाद अन् कार थेट तरूणीच्या अंगावर घातली; थरकाप उडवणारा VIDEO समोर
पीडित तरूणीच्या आईनं कमल रावतवर गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीत पीडित तरुणीच्या आईनं सांगितल्यानुसार, ‘कमल रावतने मुलीवर बलात्कार केला. याची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी कमल रावतने दिली होती.’ ‘आज तक’नं हे वृत्त दिलं आहे.