Uttarakhand Bus Accident : उत्तराखंड येथील अल्मोडा दरीत प्रवासी बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू झाला. ANI या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. बस कोसळताच या ठिकाणी मदत आणि बचावकार्य करण्यासाठी तीन पथकं दाखल झाली. एसडीआरएफतर्फे हे बचावकार्य राबवण्यात येतं आहे. आत्तापर्यंत या अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला. तसंच इतर लोक जखमी झाले आहेत. अपघातात जे लोक जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे अशी माहिती एसडीएम संजय कुमार यांनी दिली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
ANI च्या वृत्तानुसार ज्या बसचा अपघात झाला त्या बसमध्ये ४५ जण बसले होते. बसचा अपघात झाल्यानंतर तातडीने तिथे एसडीआरएफचं पथक पोहचलं. या दुर्घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त केला.तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.
First published on: 04-11-2024 at 13:33 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand bus accident news tragic bus accident in almora uttarakhand more than 20 people died several injured scj