‘कॅश फॉर व्होट स्टिंग ऑपरेशन’ प्रकरणात उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सीबीआयने त्यांना येत्या मंगळवारी चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे.
विश्वासदर्शक ठरावापूर्वी आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हरीश रावत यांनी लाचेचा प्रस्ताव दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. उत्तराखंडमध्ये बहुमत चाचणीपूर्वी एक स्टिंग ऑपरेशन समोर आले होते. या स्टिंगमध्ये रावत यांच्यावर आमदारांना प्रत्येकी २५ लाख रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला होता. रावत यांना यापूर्वी सीबीआयने ९ मे रोजी चौकशीला हजर रहाण्यासाठी समन्स बजावले होते. पण त्यावेळी त्यांनी मुदत वाढवून मागितली होती. आता त्यांना पुन्हा समन्स पाठविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना सीबीआयसमोर हजर रहावे लागणार आहे.
हरीश रावत यांना चौकशीसाठी समन्स
उत्तराखंडमध्ये बहुमत चाचणीपूर्वी एक स्टिंग ऑपरेशन समोर आले होते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
First published on: 22-05-2016 at 15:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand cm harish rawat asked to appear before cbi on may