उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भाविकांना यंदाच्या चारधाम यात्रेसाठी येण्याचं आवाहन केलं आहे. या यात्रेतील भाविकांसाठी सरकार सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देत असल्याचंही मुख्यमंत्री धामी यांनी नमूद केलं. भाविकांनी चारधाम यात्रेत येऊन उत्तराखंडमधील धार्मिक वातावरणाचा, निसर्गाच्या सौंदर्याचा आणि समृद्ध संस्कृतीचा अनुभव घ्यावं, असंही धामी यांनी नमूद केलं. ते शुक्रवारी (२१ एप्रिल) ऋषिकेश ते चारधाम यात्रा २०२३ च्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री धामी यांनी भाविकांनी भरलेल्या बसला हिरवा झेंडा दाखवत भाविकांना चारधाम यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी चालक, वाहक आणि भाविकांना हंस फाऊंडेशनने दिलेल्या किट्सचं वाटपही केलं. तसेच भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल, अशीही माहिती देण्यात आली.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा

“यंदा चारधाम यात्रा मागील सर्व विक्रम मोडीत काढेल”

मुख्यमंत्री धामी म्हणाले, “मी बाबा केदार, बद्रीविशाल, मा गंगोत्री आणि मा यमनोत्री यांना प्रार्थना करतो की, मागील वर्षीप्रमाणेच यंदाही चारधाम यात्रा विनाअडथळा उत्साहात आणि आनंदात पार पडावी. यंदा चारधाम यात्रा मागील सर्व विक्रम मोडीत काढेल, असा आम्हाला विश्वास आहे. उत्तराखंड सरकार सुरक्षित चारधाम यात्रेसाठी कटिबद्ध आहे. यात्रेसाठीच्या तयारीवर सरकारचं सातत्याने लक्ष आहे. प्रत्येक भाविकाला ही यात्रा सुरक्षितपणे पूर्ण करता यावी आणि ते आपल्यासोबत या यात्रेच्या सुवर्ण आठवणी घेऊन जावेत, असाच आमचा प्रयत्न आहे.”

हेही वाचा : विश्लेषण : ७०० हून अधिक घरं, दुकानं आणि हॉटेलांना मोठमोठ्या भेगा, हिमालयातील ‘हे’ शहर का खचतंय? वाचा…

यावेळी मुख्यमंत्री धामी यांनी पोलीस प्रशासनापासून अगदी स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना ही यात्रा उत्तररित्या पार पाडावी म्हणून सर्वोत्तम प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. तसेच भाविकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये, असे निर्देश दिले. यावेळी हंस फाऊंडेशनचे भोलेजी महाराज, कॅबिनेट मंत्री सुबोध युनियल, चंदन रामदास, महापौर अनिता मामगई, संजय शास्त्री इत्यादी हजर होते.