उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी स्टिंग ऑपरेशनमधील सीडीतील उपस्थिती मान्य केली आहे. आतापर्यंत ही सीडी बनावट असल्याचा पवित्रा सातत्याने रावत यांनी घेतला होता. पत्रकारांना भेटण्यात गैर काय अशी सारवासारव त्यांनी प्रतिक्रियेदरम्यान केली आहे.
त्या सीडीतील एक आमदार माझ्याशी बोलत. त्या वेळी ते अपात्र ठरले नव्हते. त्यामुळे आमिष दाखवण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा प्रश्न त्यांनी केला. पैशाच्या देवाणघेवाण किंवा पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात आमिष दाखवण्याचा प्रकार याचा माझा काही संबंध नाही. त्याची चौकशी करा, जर दोषी आढळलो तर सार्वजनिकरीत्या फासावर लटकवा असे आव्हानच त्यांनी दिले. सीडी तयार करणारा पत्रकार व माझी भेट झाली. मात्र माझ्यासाठी १५ कोटी रुपये कोण खर्च करेल असा प्रतिसवाल त्यांनी केला. एका खासगी वृत्तवाहिनीच्या संपादकाने ही सीडी तयार केली होती व काँग्रेसच्या ९ बंडखोर आमदारांनी ती वितरित केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा