उत्तराखंडातील चामोली आणि उत्तरकाशी या उंचसखल भागातील जिल्ह्य़ांमध्ये मंगळवारी पुन्हा हिमवृष्टी झाल्याचे वृत्त असून अन्यत्र मध्यमस्वरूपी पाऊस पडल्यामुळे बहुतांशी भागांतील तापमानात लक्षणीयरीत्या घट झाली.
चामोली जिल्ह्य़ातील अउली, बद्रिनाथ व हेमकुंडसाहिब भागात हिमवृष्टी झाली. परिणामी नंदादेवी व फूलन की घाटी यांसारखे परिसर सुमारे सात फुटी बर्फाच्या आवरणाखाली झाकले गेले. राज्यातील डेहराडून, बडकोट, दुंडा, मोरी, थराली, व मुनसराई या उत्तरकाशी जिल्ह्य़ातील भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे तेथील तापमान लक्षणीयरीत्या घसरले. डेहराडून येथे पाऊस पडल्यानंतर दुपारचे तापमान २१.४ वरून १५ अंश सेल्सियसपर्यंत घसरल्याची नोंद झाली.
उत्तरकाशी जिल्ह्य़ातील बडकोट येथे २४.४ मिलिमीटर तर मोरी येथे ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Story img Loader