उत्तराखंडमधील हलद्वानी जिल्ह्यातील बनभुलपुरा भागात मलिक बागेजवळ एका अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांवर, पोलिसांवर आणि या घटनेचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी (८ फेब्रुवारी) रात्री घडली. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात अनधिकृत मदरसा जमीनदोस्त करण्यात आला. त्यानंतर जमाव आणखी आक्रमक झाला. या जमावाने पोलीस, महापालिका आणि प्रसारमाध्यमांच्या गाड्या पेटवल्या. जमावाकडून दगडफेक सुरू असताना त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अ्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तरीदेखील जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ सुरूच होती. अखेर पोलिसांना अधिक बळाचा वापर करावा लागला. परंतु, तोवर बनभुलपुरा भागात मोठा हिंसाचार उसळला. या घटनेला २० तास उलटले तरी बनभुलपुरा भागात हिंसाचार चालू आहे. अशातच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा