उत्तरकाशीतल्या सिलक्यारा बोगद्यामध्ये अडकेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम अंतिम टप्यात आहे असं प्रशासनाने मंगळवारी (२१ नोव्हेंबर) सांगितलं होतं. बुधवारी मध्यरात्री किंवा गुरुवारी पहाटे मजुरांना सुखरूप बाहेर काढलं जाईल असंही सांगण्यात आलं होतं. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदार घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु, अंतिम खोदकामादरम्यान अडथळे येत असल्याचं सांगण्यात आलं. खोदकामादरम्यान लोखंडी सळ्यांचा अडथळा येत असल्याने अमेरिकन ऑगर मशीन सुरळीत काम करू शकत नाही असं बुधवारी सांगण्यात आलं. खोदकाम करून ३२ इंच रुंदीची नलिका (पाइप) टाकून या मजुरांना नलिकेद्वारे बाहेर काढलं जाणार आहे. परंतु, पाइप टाकण्याच्या कामामध्ये गुरुवारपासून (२३ नोव्हेंबर) कोणतीही प्रगती झाली नसल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे (एनडीएमए) शुक्रवारी देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा