पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात कथित सहभाग आणि गुन्हेगारांना अवैध शस्त्र पुरवठा करणाऱ्या आरोपीची दिल्लीच्या तिहार तुरूंगातून नुकतेच जामीनावर सुटका झाली होती. मात्र शनिवारी या ५५ वर्षीय व्यक्तीला पोलि‍सांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या खुर्जा गावातून पुन्हा अटक केली आहे. त्याच्यावर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप आहे.

रिझवान अंन्सारी (५५) हा शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात तुरूंगात होता. त्याच्यावर पु्र्वी लॉरेन्स बिश्नोई गँगला शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. यासह पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या २०२२ मध्ये झालेल्या हत्येशीदेखील त्याचा संबंधांची पोलिस चौकशी करत आहेत. अंन्सारी हा शुक्रवारी रात्री घरी परतला होता. तुरूंगातून सुटून घरी आल्यामुळे चाहत्यांनी डिजे लावून जंगी मिरवणूक आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती, याचे व्हिडीओ शोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

एसएसपी (बुलंदशहर) श्लोक कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला बोलताना सांगितले की, “अन्सारी हा गुरूवारी जामीन मिळाल्यानंतर खुर्जा येथील त्याच्या घरी परतला. यावेळी त्याच्या समर्थकांनी उत्सव साजरा करताना सार्वजनिक शांततेचा भंग केला. त्याच्या स्वागतात फटाके फोडण्यात आले, तसेच समर्थांनी मोठ्या आवाजात संगीत वाजवले. या प्रकरणात एफआयआर दाखल केल्यानंतर अन्सारी त्यांचा मुलगा मोहमद्द अदनान (२१) यांना अटक करण्यात आली आहे. यासह सात अवैध देशी बनावटीची पिस्तुले, दोन दोन शस्त्रे आणि अनेक काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.”

पोलिसांनी सांगितले की अंन्सारी हा देशभरातली गँगस्टर्सना शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या तस्करांच्या सिंडिकेटचा भाग आहे. त्याला २०२४ मध्ये दिल्ली गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते आणि त्याला पकडण्यासाठी २५,०० रुपयांचे बक्षिसदेखील ठेवले होते. राष्ट्रीय तपास संस्था (एएनआय)ने त्याला मुसेवाला हत्या प्रकरणात त्याच्या कथित संबंधामुळे यापूर्वी ताब्यात घेतले होते, असेही पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा>> Azerbaijan Plane Crash : अझरबैजानचे विमान पाडल्याबद्दल पुतिन यांनी मागितली माफी, ३८ लोकांचा झाला होता मृत्यू

एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, “अन्सारीचे भाऊ कुर्बान आणि रेहान हे सुमारे १५ वर्षांपूर्वी खुर्जा येथे स्वीच बनवणाऱ्या सिरॅमिक कारखाण्यात काम करत होते, त्यानी शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीबरोबर संबंध होते. पुढे अंन्सारी देखील त्यांच्यामध्ये सहभागी झाला. दिल्ली- एनसीआर, गाजियाबाद, अलीगढ, हापूर इत्यादी ठिकाणच्या गुन्हेगारांना अवैध शस्त्र पुरवण्याचे सिंडिकेट सुरू केले. कुर्बान याचा कोरोना महामारीच्या काळात मृत्यू झाला पण अन्सारी याने अवैध व्यापार सुरूच ठेवला”.

Story img Loader