वयाच्या दाखल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत एका मुलाखतीत केलेल्या शेरबाजीबद्दल माजी लष्कर प्रमुख व्ही.के.सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली.
सिंह म्हणाले, “न्यायालय वा न्यायाधिशांची अप्रतिष्ठा करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. माझ्या विरुद्ध निर्णय व्हावा म्हणून मोठी लॉबी कार्यरत आहे. असे मी म्हणालो पण हा निर्णय प्रशासकीय पातळीवरचा होता. माझा रोख न्यायालयाविरुद्ध नव्हता. चुकीच्या पद्धतीने माझ्या शब्दांचा अर्थ लावला गेला आणि परिणामी न्यायालयासंदर्भात आक्षेपार्ह बोलल्याचा समज निर्माण झाला.” असेही सिंह म्हणाले.
व्ही.के.सिंह यांचा माफिनामा
वयाच्या दाखल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत एका मुलाखतीत केलेल्या शेरबाजीबद्दल माजी लष्कर प्रमुख व्ही.के.सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली.
First published on: 19-11-2013 at 10:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: V k singh apologises to supreme court over comments on his age row verdict